2 May 2024 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

D B Realty Share Price | गौतम अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, शेअर्समध्ये रोज मोठा परतावा मिळतोय, डिटेल वाचा

D B Realty Share Price

D B Realty Share Price | शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘डी बी रियल्टी’ कमोंक शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर आज 4.99 टक्के वाढीसह 93.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही ‘डीबी रियल्टी’ कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. आणि शेअरची किंमत 89.25 रुपये किमतीवर गेली होती. शेअर्समध्ये अचानक ही उसळी येण्याचे कारण म्हणजे, ‘डीबी रियल्टी’ कंपनीचा संयुक्त उपक्रम ‘रेडियस इस्टेट्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ गौतम अदानी यांनी खरेदी केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, D B Realty Share Price | D B Realty Stock Price | BSE 533160 | NSE DBREALTY)

डीबी रियल्टीची अदानीसोबत डील :
गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाची कंपनी असलेल्या ‘अदानी गुडहोम्स’ ने ‘रेडियस इस्टेट्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दिवाळखोर रिअल इस्टेट कंपनीला खरेदी केले आहे. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या अहवालात, ‘अदानी गुडहोम्स’ कंपनीने या दिवाळखोर कंपनीसाठी कर्जदार ज्या रकमेची मागणी करत होते त्यातून 98 टक्के सवलतीवर बोली लावली आहे.

सूत्रा कडून मिळालेल्या माहीतीनुसार, अदानी उद्योग समूहाच्या ‘अदानी गुडहोम्स’ कंपनीने डीबी रियल्टी कंपनीच्या कर्जदारांना 319.7 दशलक्ष रुपयेची ऑफर दिली आहे. रेडियस इस्टेट अँड डेव्हलपर्स आणि एमआयजी वांद्रे रियल्टर्स अँड बिल्डर्स हे डीबी रियल्टीचे संयुक्त उपक्रम आहेत. एमआयजी वांद्रे रियल्टर्स अँड बिल्डर्स ही कंपनी DB Realty ची उपकंपनी आहे. यामुळेच डीबी रियल्टी कंपनीने नुकताच स्टॉक मार्केट नियामक सेबीला सादर केलेल्या कागदपत्रात NCLT ने रेडियस इस्टेटसाठी अदानी गुडहोम्सच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली असल्याची माहिती दिली आहे.

अदानी समूहाला फायदा :
या खरेदी करारानंतर अदानी समूह बीकेसी मधील 10 प्रकल्प ताब्यात घेऊ शकतात. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स किंवा BKC मध्ये अनेक स्थानिक आणि जागतिक बँकांची मुख्यालये, कार्यालय आहेत. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजेच स्लम एरिया धारावी देखील जवळच आहे. नुकताच धारावी झोपडपट्टीचा विकास करण्यासाठी अदानी समूहाची सर्वात मोठी बोली लावली होती, आणि पुनर्बांधणीचे कंत्राट अदानीने जिंकले आहे. बीकेसी मध्ये चालू असलेला प्रकल्प 5 एकरमध्ये विस्तारलेला आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून 25 अब्ज रुपयांची कमाई होणे अपेक्षित आहे.

डीबी रियल्टी या रिअल इस्टेट कंपनीने स्टॉक नियामक सेबीला कळवले होते की, तिची उपकंपनी ‘गोरेगाव हॉटेल’ आणि रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडने रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडसोबत लोन सेटलमेंट केला आहे. डीबी रियल्टी लिमिटेडने स्टॉक एक्सचेंज कम्युनिकेशनमध्ये माहिती दिली आहे की, कर्ज कराराच्या संदर्भात दोन्ही पक्षांनी ‘सर्व दावे’ निकाली काढले आहेत. डीबी रियल्टी आणि तिची उपकंपनी ‘गोरेगाव हॉटेल’ आणि रिअॅल्टी प्रायव्हेट लिमिटेड यांनी रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडकडून घेतलेल्या सर्व कर्जाची परतफेड करण्यासाठी करार केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | D B Realty Share Price 533160 DBRealty in focus check details on 13 January 2023.

हॅशटॅग्स

DB Realty Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x