26 May 2022 10:56 PM
अँप डाउनलोड

पाकिस्तान ची १६२८ कोटीची आर्थिक मदत थांबवली : अमेरिका

वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पाकिस्तान ला अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदती संबंधित केलेल्या वक्तव्या नंतर, आज अखेर अमेरिकेने पाकिस्तान ची १६२८ कोटीची आर्थिक मदत थांबवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच वक्तव्य केलं की आम्ही पाकिस्तान सरकारला आज पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने ३३ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत केली. परंतु आम्ही केवळ मूर्खच ठरलो. कारण पाकिस्तान ने आम्हाला त्या मदतीच्या मोबदल्यात केवळ धोकाच दिला. ती आर्थिक मदत थांबवण्या मगच मूळ कारण आहे की आम्ही ज्या खतरनाक दहशतवाद्यांना अफगाणिस्तान मध्ये शोधत होतो, त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आपल्याच देशात आश्रय दिला होता,’ असा थेट आरोपच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान सरकारवर केला.

या वर्षात पाकिस्तानला अमेरिकेकडून तब्बल २५५ कोटी डॉलर्सची आर्थिक मदत होणार होती. परंतु त्या आर्थिक मदतीच्या मोबदल्यात जर पाकिस्तानला दहशतवादी कारवाया रोखण्यात अपयश आल्यास ही सर्व आर्थिक मदत थांबवली जाऊ शकते असे अमेरिकन प्रशासनाने आधीच सूचित केले होते त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#America(22)#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x