27 July 2024 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पुणेकर श्री. विजय गोखले यांची भारताच्या परराष्ट्र सचिव पदी नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे येत्या २८ जानेवारी रोजी सेवेतून निवृत्त होत असून त्यांच्या जागी आता मूळचे पुणेकर विजय गोखले यांची नियुक्ती झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव पदी नियुक्ती झालेले ते दुसरे महाराष्ट्रीयन ठरले आहेत.

श्री. विजय गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आय.एफ.एस) १९८१ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी या पूर्वी भारताचे राजदूत म्हणून हॉंगकॉंग, बीजिंग आणि हनोई देशात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तत्पूर्वी पुण्याचेच राम साठे यांनीही भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून जवाबदारी सांभाळली आहे.

विजय गोखले हे चीन विषयाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी भारत – चीन मधील डोकलाम वाद सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x