15 December 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

गुजरात टेन्शनमध्ये! एका धोबी व्यावसायिकामुळे सूरतमध्ये ५४ हजार लोक क्वारंटाइन

Corona Crisis, Covid 19, Gujarat Laundryman tested corona positive

सुरत, ३ मार्च:  भारतात संसर्गाचा वेग वाढत असला तरी देखील निजामुद्दीनच्या मरकजमधील घटनेमुळे नवे ६० टक्के रुग्ण वाढले आहेत. देशात आतापर्यंत २०८८ लोकांना संसर्ग झाला असून त्यांपैकी १५६ रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यूचा आकडाही दोन आकडी असून भारतात आतापर्यंत ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे लक्षात घेता भारताची स्थिती युरोपीय देशांपेक्षा चांगली आहे, हे नक्की.

दुसरीकडे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसत आहे. गुरुवारपर्यंत ४२३ वर असलेली संख्या आता ४९० वर पोहचली आहे. आज ६७ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्राचं टेन्शन आणखी वाढलं आहे. मात्र गुजरामधील घटनेने धास्ती वाढण्याची शक्यता आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या विषाणूचा फटका गुजरातलाही मोठ्याप्रमाणात बसला आहे. सूरत शहरात एका धोबी व्यावसायिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या शहरातील १६८०० घरातील सुमारे ५४००० लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण परिसरात १२ रुग्णालये, २३ मशिदी, २२ मुख्य रस्ते आणि ८२ अंतर्गत रस्ते सॅनिटाइज करण्यात आले आहे. त्याशिवाय महानगरपालिकेने १६७८५ घरांचेही सॅनिटाइज केले आहे. ५४००३ लोकांना होम क्वारंटाइन करण्यासाठी ५५ पथके तैनात करण्यात आली आहेत.

६७ वर्षीय धोबी व्यावसायिक हा कोरोना विषाणू बाधित असल्याचा दुजोरा मिळाल्यानंतर त्याची पत्नी, मुले, मेव्हणा आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या इतर धोबी व्यावसायिकांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. लाँड्रीच्या एक किमी परिसराचे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

 

News English Summary: Corona virus does not appear to be taking the name of a stop. The outbreak of the virus has also been widely reported in Gujarat. About 54,000 people have been made home quarantine in 16800 houses in this city after the Corona Report of a Dhobi businessman came positive in Surat city. According to media reports, 12 hospitals, 23 mosques, 22 main roads and 82 internal roads have been sanitized in the entire area. In addition, the municipality has sanitized 16785 houses. 55 squads have been deployed to quarantine 54003 people.

 

News English Title: Story Laundryman tested corona positive in Surat about 54000 people have placed under home quarantine Covid 19 News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x