11 November 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | फायदा घ्या, LIC शेअर 50% परतावा देणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: LICI Property Rights | लग्नानंतर सुनेला पतीची अर्धी संपत्ती आणि सासरच्या घराच्या प्रॉपर्टीत हक्क मिळतो का, लक्षात ठेवा नियम - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | ऑटो शेअर तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY CIBIL Score | सिबिल स्कोर वाढवायचा असेल तर या 4 टिप्स फॉलो करा, लोनसंबंधी कोणतीही अडचण भासणार नाही - Marathi News Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात दिला 67% परतावा, संधी सोडू नका - Penny Stocks 2024
x

शेतकऱ्यांची कर्जमाफी... ती बँकच अस्तित्वात नाही? शिंदे-फडणवीस सरकारची शरद पवारांकडून पोलखोल

Sharad Pawar

NCP President Sharad Pawar | राज्यात सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी प्रचंड संकटात आहेत. त्यामुळे काल माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे आसूड फक्त हातात ठेवू नका तो वापरा, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्य सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं. त्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वातावरण ढवळून निघालं आहे.

राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यावर बोलताना “अतिवृष्टीने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई केंद्र आणि राज्य सरकारने करावी अशी विरोधकांनी मागली केली आहे आणि त्यासाठी राज्य सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिंदे-भाजपा सरकारची पोलखोल केली आहे.

भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच, भू-विकास बँकेकडून सरकारला येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती.

राज्य सरकारने भू-विकास बँकेचे कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं. गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेचे कर्ज एकाला तरी मिळालं का? भूविकास बँक अस्तित्वात आहे का? भूविकास बँक होती का? याची माहिती नाही. २५ ते ३० वर्षे झाली बँकेची कोणी कर्ज वसुली केली नाही. राहिलेली वसुली होणार नाही हे कळल्यावर, कर्ज माफी देण्यात आली. ‘लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं’ असं भाजपावल्याचं काम आहे,” अशी अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sharad Pawar exposed Shinde Fadnavis government over Bhu Vikas Bank farmer loan waiver check details 24 October 2022.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x