26 April 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही - चंद्रकांत पाटील

BJP, Chandrakant Patil, Sharad Pawar, Amit Shah

मुंबई, २९ मार्च: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यासंदर्भात आज पुण्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही मला माहीत नाही. मात्र अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती तर भेट झाली नाही, असं ते म्हणाले असते. पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही. त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही, असंही ते म्हणाले. भारतीय संस्कृतीत अशा भेटी होतच असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून हे चित्रं कमी झालं आहे.

विरोधी पक्ष म्हणजे दुश्मनच असं चित्रं निर्माण झालं आहे. मात्र, काही असलं तरी राजकीय भेटी घेण्यात काही वावगं नाही, असंही ते म्हणाले. भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याला तुम्ही तयार असाल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, मी सच्चा स्वयंसेवक आहे. पक्षश्रेष्ठी ठरवेल ते मला मान्य असेल. शेवटी पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात. नेत्याची इच्छा ही आज्ञा असते आणि आज्ञा नेहमी पाळायची असते, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

 

News English Summary: I don’t know if NCP’s President Sharad Pawar and Union Home Minister Amit Shah met. But Amit Shah’s speech indicates that. He would have said that if the meeting had not taken place, the meeting would not have taken place said Chandrakant Patil.

News English Title: BJP state president Chandrakant Patil talked on Sharad Pawar and Amit Shah meet news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x