14 May 2021 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच.... मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट
x

PMC बँकेच्या पुनरुज्जीवन संदर्भात पवारांनी अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली

PMC Bank, Sharad Pawar, Anurag Thakur

नवी दिल्ली: बहुचर्चित पीएमसी बँकेच्या पीएमसी बँकेच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या संदर्भात शरद पवार यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन केंद्राकडून तोडगा काढण्यात यावा यासाठी पुढाकार घेतला आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे लाखो ग्राहकांना फटका बसला असून अनेकांनी या धक्क्यामुळे प्राण देखील गमावले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबई दौऱ्यावर आल्या असताना बँकेच्या ग्राहकांनी त्यांना घेरलं होतं. त्यावेळी घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नसल्याचं सांगत त्यांनी जवाबदारी झटकली होती. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या होत्या की, या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केलं. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचं काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होते.

त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांच्यासमोर आंदोलन केलं होतं आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली होती. परंतु या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही असं अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटलं होत.

पंजाब महाराष्ट्र बँकेतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी दिल्लीतही आंदोलन झाली. बँकेतील अनियमिततेला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी खातेधारकांनी केली यापूर्वीच केली आहे. या प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष आणि एचडीआयएलच्या दोन संचालकांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमसीतील एकूण आर्थिक अपहार ४३५५ कोटी रुपयांचा आहे.

 

Web Title:  NCP President Sharad Pawar meet Union Finance Minister for State Anurag Thakur over PMC Bank issue.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(381)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x