27 April 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
x

भाजपचा संबंध नाही कसा? दिल्ली पक्ष कार्यालयातच पुस्तक प्रसिद्ध झाले: शिवसेना

Aaj Ke Shivaji Narendra Modi book, BJP Leader Jai Bhagwan Goyal, Shivsena, MP Sanjay Raut

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल रात्री उशिरा दिली. मात्र यावरुन शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाचा लक्ष्य केलं आहे. ‘आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका शिवसेनेनं ‘सामना’मधून केली आहे.

दरम्यान, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून शिवसेनेनं कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाचे लेखक गोयल यांच्याशी पक्षाचा संबंध नाही, असं भारतीय जनता पक्षानं स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेनं पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या वर्मावर बोट ठेवलं आहे. “आता भारतीय जनता पक्षावाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भारतीय जनता पक्षाचे नेते त्या वेळी हजर होते. हे गोयल आजही म्हणतात, ”आमचे शिवाजी फक्त नरेंद्र मोदीच!” असं सांगत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर टीकेचा बाण सोडला.

ज्या लोकांनी पंतप्रधान मोदींना शिवाजी म्हणून संबोधले आहे, त्यांनीच लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना विष्णुचे तेरावे अवतार म्हटले होते. अशा लोकांमुळे देव, देश, धर्माचाही अपमान आहे. यात पंतप्रधान मोदींची कोंडी होत आहे. ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंगी आणि चमचेगिरीचा उत्तम नमुना असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.

छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार. भाजपाची तोंडे म्यान झाली म्हणून आम्ही हे ‘शिवव्याख्यान’ मांडले, असंही अग्रलेखात पुढे म्हटलं आहे.

 

Web Title:  Shivsena Party asked question to BJP over Aaj Ke Shivaji Narendra Modi book.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x