12 December 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

मला दिल्लीत बोलावून मनिष भानुशालीकडून मारहाण, दबावही टाकला | मला गुजरातमध्येही मारून फेकतील - सुनील पाटील

Sunil Patil made serious allegations on Manish Bhanushali

मुंबई, 07 नोव्हेंबर | सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील (Sunil Patil made serious allegations on Manish Bhanushali) यांनी म्हटलंय.

Sunil Patil made serious allegations on Manish Bhanushali. My life was in danger. I was beaten by Dhawal Bhanushali, Manish Bhanushali and some others in Delhi. Three or four tried to pressure me. I was called to Delhi from Ahmedabad said Sunil Patil :

मनिष भानुशालीने जी नावं पाठवली होती, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं. काही तरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने चौकशी करावी. 1 तारखेला मला मनिष भानुषालीने यादी पाठवली होती. ही लिस्ट मला सॅम्युअल डिसूजाला द्यायची होती. पण त्या लिस्टमध्ये आर्यनचं नाव नव्हतं. ही लिस्ट मी पत्रकार आणि एजन्सीला देणार आहे. माझ्याकडे व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि रेकॉर्डिंगचा पुरावा आहे. लिस्ट व लोकेशन आहे माझ्याकडे,” असं सुनिल पाटील म्हणाले.

इतके दिवस समोर का नाही आलात?
माझ्या जिवाला धोका होता. मला दिल्लीत धवल भानुशाली, मनिष भानुशाली आणि इतर काही लोकांनी मारहाण केली. तिघा-चौघांनी मला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मला अहमदाबादवरून दिल्लीला बोलवण्यात आलं. गुजरातमध्येही मारून फेकतील. मला मनिष भानुशाली आणि धवल भानुशाली हे दोघेही सांगत होते की कुठे जायचं नाही. माझी स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे मी कसबसा जीव वाचवला आणि मुंबई गाठली.

नेमकं काय म्हणाले सुनील पाटील?
सुनील पाटील-मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही, क्रूझ पार्टीची टीप मनिष भानुशालींकडे आली होती. नीरज यादव हे भाजपचे नेते आहेत. ते कैलाश विजयवर्गीय यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळी मी आणि मनिष अहमदाबादला होतो. त्यावेळी कॉर्डिलियाला मोठी पार्टी होणार आहे आणि छापा पडणार आहे असं सांगण्यात आलं आहे. मी त्या पार्टीत सहभागी व्हायला नकार दिला. के. पी. गोसावीही तेव्हा दुसऱ्या हॉटेलवर थांबला होता.

मी समीर वानखेडेंना ओळखत नाही. त्यांच्याशी माझं एक सेकंदही बोलणं झालेलं नाही. के.पी. गोसावी आणि मनिष हे गांधीनगरला मंत्रालयात गेले होते. ही बाब एक ऑक्टोबरची आहे. संध्याकाळी चार वाजता नकार दिला. तर ८.३० च्या दरम्यान मी मनिषला फोन केला त्याला विचारलं कुठे आहात? तर त्याने मला सांगितलं की आम्ही आयबीचे सहेब आहेत जडेजा म्हणून त्यांच्यासोबत बसलो आहोत.

किरणने मला तसाच मेसेज केला. त्यानंतर रात्री नऊ वाजता हे दोघे रूमवर आले. त्यानंतर मनिष आणि नीरज यादव यांचं बोलणं झालं. मी तेव्हाही म्हटलं की मला या कुठल्या भानगडीत पडायचं नाही. मला टीप द्यायचीही नाही आणि मला ते ऐकायचंही नाही. समीर वानखेडे तुझा मित्र आहे का? असं मला विचारण्यात आलं. मी सांगितलं मी त्यांना ओळखत नाही. माझा सीडीआर काढा. वानखेडे सरांच्या फोनमध्ये माझा एक मेसेज मिळेल काँग्रएट्स केल्याचा. मला सॅम डिसूझाने नंबर पाठवला होता आणि सांगितलं होतं की रेड केली आहे म्हणून एक मेसेज कर. त्यामुळे मी मेसेज केला असं सुनील पाटील यांनी मुंबई तकला सांगितलं.

सॅमचं नाव सॅनविल डिसूझा आहे. विजय ठाकूर आमचा कॉमन मित्र आहे त्याच्या मार्फत आमची ओळख झाली होती. मला चार महिन्यांपूर्वी सॅमने एक समन्स व्हॉट्स अॅपवर पाठवला होता. व्यवसाय प्रकरणात मला ड्रग्ज प्रकरणी समन्स आलं आहे. मला पैशांची मदत हवी आहे असंही सांगितलं आहे. मला पाच ते दहा लाख रूपये देशील का? मी म्हटलं माझी अडचण आहे मी पैसे देऊ शकत नाही आणि कुणालाही ओळखत नाही. नंतर सॅम माझ्याशी बोलला तेव्हा म्हणाला की मी एनसीबीच्या ऑफिसरला 25 लाख रूपये दिले आहेत माझं काम झालं आहे.

किरण आणि मनिषला मी सांगितलं की एनसीबीसोबत सॅमचा कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे त्यांचे नंबर दिले, मला सांगत होते की तू पण चल. मी म्हटलं मी नाही येणार, मला काम आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sunil Patil made serious allegations on Manish Bhanushali over Aryan Khan case.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x