15 December 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

मुंबई पोलीस सुशांतसिंग राजपूतच्या कुटूंबावर दबाव आणत असल्याचा वडिलांचा आरोप

Sushant Singh Rajput, Mumbai police, Mahesh Bhat, Ankita Lokhande

मुंबई, २९ जुलै : रियावर एफआयआर दाखल झाल्याचं कळताच बिहार पोलिसांनीही कारवाईसाठी पुढील पावलं उचलत मुंबई गाठली. या सर्व घडामोडी पाहता आता रिया चक्रवर्ती हिनं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्याचं कळत आहे. रियानं सुशांतची फसवणूक केल्याच्या संशलयायवरुन आणि त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली. सुशांतच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली असून, यामध्ये तिनं सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दुरावल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, विकास सिंह यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना असेही म्हटले आहे की, मुंबई पोलीस सुशांत सिंग राजपूत याच्या कुटूंबावर दबाव आणत आहेत आणि त्यांना मुंबईच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव घेण्यास सांगत आहेत. सोबतच मुंबई पोलीस सुशांतच्या कुटूंबावर बड्या चित्रपट निर्मात्यांचे नाव घेण्यासाठी दबाव आणत आहेत. आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब अद्याप पोलिसांच्या चौकशीबाहेर आहेत.

पुढे विकास म्हणाले की, एफआयआरनंतर ताबडतोब रिया चक्रवर्ती हिला अटक केली जाईल असे आम्हाला वाटले, परंतु तसे झाले नाही. तथापि, आम्हाला अजूनही आशा आहे की, मुंबई पोलिस लवकरच अटक करतील. या संपूर्ण प्रकरणात विनय तिवारी (एसपी सिटी, पाटणा) यांनी बिहार पोलिसांची टीमही मुंबईत दाखल झाली असून तपास करत असल्याचे सांगितले आहे. मुंबई पोलिसांना मदत करण्याच्या प्रश्नावर विनय तिवारी म्हणाले की, याची कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्यानुसार काम केले जात आहे.

मात्र याप्रकरणी आताच हाती आलेले महत्त्वाचे अपडेट म्हणजे, महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. 5 वाजता ही बैठक होणार आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांचा याप्रकरणी सुरू असलेला तपास आणि हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने प्रकरणाचा तपासाला काही एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Vikas Singh also told a news channel that Mumbai police were putting pressure on Sushant Singh Rajput’s family and asking them to name the production house in Mumbai. At the same time, the Mumbai Police is putting pressure on Sushant’s family to name big filmmakers.

News English Title: Sushant Singh Rajput family under pressure from Mumbai police; Serious allegations made by the lawyer News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x