27 July 2024 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका
x

दीपाली सय्यद यांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली, विवाहित जोडप्यांचा पुन्हा बोगस विवाह सोहळा दाखवून फसवणूक

Actress Deepali Sayyed

Actress Deepali Sayyed | अनेक पक्ष फिरून आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आणि शिंदे गटातने प्रवेशासाठी वेटिंगवर ठेवलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. दीपाली सय्यद यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला, लग्न होऊन अपत्य झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखविला असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सांगलीमध्ये विवाहित बोगस मुलींची लग्न
शिंदे म्हणाले, दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्रात दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो कोटींची मदत केली. परंतु जेव्हा ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ३१ मार्च २०१८ अखेर ९ हजार १८२ रुपये त्यांच्या खात्यावर शिल्लक होते. ९-९-२०२१ रोजी दीपाली सय्यद यांनी सांगलीमध्ये बोगस मुलींची लग्न लावली. यात काही मुलींचं लग्न २०१६ पूर्वी झालं होतं. त्या मुलींना २०१८ मध्ये अपत्यही झालं होतं. त्याची पुरावाही माझ्याकडे आहे. दीपाली सय्यद यांनी ही लग्न ९-९-२०२१ ला पुन्हा लावून दिली, असाही आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला.

आत्मदहनाचा इशारा :
ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी करावी. अन्यथा आत्मदहन करणार”, असा इशारा दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी दिलाय. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून काही भूमिका घेण्यात येते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

फक्त ९ हजार रुपये शिल्लक असताना देखील दीपाली सय्यद यांनी हजारो कोटींची मदत कशी केली? असा सवाल करत दीपाली सय्यद यांचं पाकिस्तानी आणि दुबईशी काय कनेक्शन आहे हे आर्थिक गुन्हे शाखेनं शोधलं पाहिजे अशीही मागणी शिंदे यांनी केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Actress Deepali Sayyed made fraud through charity trust said ex PA check details on 07 December 2022.

हॅशटॅग्स

#Actress Deepali Sayyed(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x