19 January 2025 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

Devara Movie on Box Office | देवरा चित्रपटाने पहिल्याच दिवशी तोडला रेकॉर्ड, पार केला 300 करोडचा आकडा - Marathi News

Highlights:

  • Devara Movie on Box Office
  • 300 करोडोंचा आकडा केला पार :
  • अशी आहे चित्रपटाची स्टोरी :
Devara Movie on Box Office

Devara Movie on Box Office | कोरताला शिवा दिग्दर्शित ‘देवरा’ चित्रपट अखेर 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होणार म्हणून थिएटरच्या बाहेर अभिनेता जुनियर एनटीआरचे बॅनर आणि पोस्टर्स लावले गेले आहेत.

दरम्यान जूनियर एनटीआरच्या चहात्यांनी फटाके आणि फुलबाज्या उडवत चित्रपटाचं स्वागत केलं आहे. चित्रपटाचा एकूण बजेट 300 करोड होता. परंतु पहिलाच दिवशी देवराने 300 करोडोंचा आकडा पार करून बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे.

300 करोडोंचा आकडा केला पार :

चित्रपटाच्या बजेट विषयी सांगायचं झालं तर, देवरा चित्रपट बनवण्यासाठी 300 करोड रुपयांचा बजेट झाला होता. परंतु हा चित्रपट फक्त हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्येच नाही तर, इतरही भाषांमध्ये रिलीज झालेला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 446 करोड रुपयांचा गल्ला कमावला आहे. हे केवळ (1st day Box Office Collection) असून चित्रपट किती करोडोंचा आकडा गाठणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. काही माध्यमांकडून असं समजतंय की, देवराने त्यांचे डिजिटल राइट्स 155 करोड रुपयांनी नेटफ्लिक्सला विकले आहेत. त्याचबरोबर म्युझिक राईट 33 करोडो रुपयांना विकले आहेत. एवढंच नाही तर देवराने वर्ल्डवाईड 6000 स्क्रिनिंग केलं आहे.

अशी आहे चित्रपटाची स्टोरी :

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता ज्युनियर एनटीआर, अभिनेत्री जानवी कपूर आणि सैफ अली खान झळकले आहेत. चित्रपटामध्ये आपल्याला समुद्री लुटेऱ्यांची कहानी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जानवी कपूर आणि ज्युनिअर एनटीआर या दोघांची रोमँटिक लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी चित्रपट गृहांबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. या आधी ज्युनिअर एनटीआरने RRR या चित्रपटामध्ये काम करून स्वतःच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

देवरा या चित्रपटातुन देखील ज्युनियर एनटीआरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याचबरोबर जानवी कपूर हिला पहिल्यांदाच जुनियर एनटीआर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली असता पुढील पाच ते सहा दिवसांत देवरा चित्रपट किती कोटींचा आकडा पार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

Latest Marathi News | Devara Movie on Box Office 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Devara Movie on Box Office(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x