14 July 2020 6:14 PM
अँप डाउनलोड

VIDEO - 'पानिपत'! मराठयांची ऐतिहासिक आठवण; ऍक्शन सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Bollywood, Sanjay Dutt, Arjun Kapoor, Panipat Action Movie, Ashutosh Gowarikar

मुंबई: हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत हे ऐतिहासिक स्थळ…’हर हर महादेव’चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज…. मराठ्यांचा इतिहास भव्य – दिव्य रूपात पडद्यावर मांडणाऱ्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

बहुप्रतिक्षित व बहुचर्चित अशा ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सगळेच पराभव विसरण्यासारखे नसतात. काही पराभव नावाला पराभव असले तरी तुम्हाला अजरामर करुन जातात. अशाच एका पराभवाबद्दलचा इतिहास रुपेरी पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. १४ जानेवारी १७६१ या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावरचा हा चित्रपट आहे.

बहुप्रतीक्षित ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. आशुतोष गोवारिकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळत आहे.

संजय दत्त आणि अर्जुन कपूर यांचे लूक्सही उत्सुकता निर्माण करणारे आहेत. संजय दत्त अहमदशाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. यात तो एका क्रूर शासकाच्या रुपात दिसतोय. याअगोदर काल म्हणजे ४ नोव्हेंबरला पोस्टर्स रिलीज करुन मुख्य पात्रांची ओळख करुन देण्यात आली होती. काही मिनिटांतच लाखो लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#filmy(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x