27 July 2024 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

Sameer Wankhede | समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश, सीबीआयला जबाब नोंदविण्याच्या सूचना

Aryan Khan Case

Sameer Wankhede | मुंबई हायकोर्टाच्या व्हेकेशन कोर्टात ही सुनावणी पार पडली, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, आरिफ एस डॉक्टर या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. समीर वानखेडे यांच्या वतीने रिझवान मर्चंट यांनी युक्तीवाद केला. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरवर वानखेडेंच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले.

मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत अटक न करण्याचा निर्देश दिला आहे. कोर्टाने सीबीआयला वानखेडे यांचा जबाब नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर वानखेडे यांनी सीबीआयला तपासात सहकार्य करावं, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच कोर्टाने सीबीआयला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

वानखेडेंच्या वकिलांचा कोर्टात काय युक्तिवाद?
समीर वानखेडे यांच्यावरची कारवाई पूर्वग्रहदूषित आहे, तत्कालिन एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर वानखेडे यांनी हायकोर्टात गंभीर आरोप केले. तुम्ही अटकपूर्व जामीन का सादर केला नाही? असा प्रश्न कोर्टाने वानखेडेंच्या वकिलांना विचारला, तेव्हा आम्ही अटकपूर्व जामीन मागणार नाही, कारण हा पूर्ण बनाव आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. अत्यंत चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं मनोधैर्य खच्ची केलं जात आहे, असा युक्तीवाद समीर वानखेडेंच्या वकिलांनी केला.

तुम्हाला जर 41 A ची नोटीस दिली असेल, तर तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात जा, असंही हायकोर्टाने वानखेडेंना सांगितलं. तसंच वानखेडे तपासात सहकार्य करतील, त्यांचा जबाब नोंदवून घ्या, अशा सूचनाही कोर्टाने सीबीआयला दिल्या आहेत.

समीर वानखेडे यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अभिनेता शाहरुख खानसोबत झालेल्या संभाषण समोर आणलं आहे. हे मेसेज शाहरुखने पाठवले होते, असा वानखेडेंचा दावा आहे. यामध्ये आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुखने वानखेडेंना काळजी घेण्याची विनंती केली होती. वानखेडे यांना अनेकदा विनंती करून शाहरुखने म्हटले होते की,’आर्यन खानला चांगली वागणूक द्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bollywood superstar Shaharukh Khan son Aryan Khan case Sameer Wankhede check details on 19 May 2023.

हॅशटॅग्स

#Sameer Wankhede(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x