2 May 2024 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

देशात कोरोनावरील लस तयार, जुलैपासून चाचणी, यापूर्वी अनेक लसची निर्मिती

India Corona virus Vaccine, Covid 19, Covaxin

हैदराबाद, ३० जून : कोरोना व्हायरसमुळं सातत्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सोबतच संशोधकही या विषाणूचा नायनाट करण्यासाठीची लस शोधण्यात सर्व मार्गांचा अवलंब करत आहेत. प्रयत्नांच्या याच साखळीमध्ये आता संशोधकांना यश मिळाल्याचं कळत आहे. त्यामुळं हा एक मोठा दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे. भारतात कोरोनावरील ही पहिली लस विकसित करण्यात आली असून, लसीच्या मानवी चाचणीला परवानगी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी दिली.

जुलै महिन्यामध्ये या लसीची क्लिनिकल ट्रायल घेतली जाणार आहे. भारत बायोटेकनं ही कोरोनावरील लस विकसीत केली आहे. मुळच्या हैदराबाद येथील असणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीनं कोव्हॅक्सिन COVAXIN ही लस विकसीत करत त्याला मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाल्याची माहिती दिली. आयसीएमआर आणि National Institute of Virology (NIV) यांचंही या लसीमध्ये योगदान आहे.

दरम्यान, भारत बायोटेकने याआधी देखील पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी, इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आदी व्हायरसवर लस बनवल्या आहेत. या आधी कंपनीने प्री क्लिनिकल अभ्यासातून मिळवलेला अहवाल सादर केला होता. त्यानुसार डीसीजीआय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीच्या फेज १ आणि फेज २ या मानवी चाचणीला परवानगी दिली आहे. भारतात विकसित झालेल्या या लसीमुळे सर्वांनाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

 

News English Summary: A clinical trial of the vaccine will be conducted in July. Bharat Biotech has developed this vaccine against corona. Bharat Biotech, a Hyderabad-based company, has developed a vaccine called COVAXIN, which has been approved for human testing.

News English Title: Indias first Corona virus Covid 19 vaccine Covaxin gets nod for human trials from July News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x