13 December 2024 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

COVID 19 Vaccine: इस्रायल भारताला कोरोना लस निर्मितीची माहिती देणार

COVID 19 Vaccine, Israels

नवी दिल्ली, ७ मे: इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने कोरोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस (COVID 19 Vaccine) विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरु झाल्या आहेत का? तसेच याची लस विकसित करण्यासंबंधीची माहिती इतरांना देणारा का? या प्रश्नावर इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का बोलत होते.

“कोरोना व्हायरसमुळे भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश अधिक जवळ आले असून Covid-19 चा कसा सामना करायचा? याबद्दलचे अनुभव परस्परांना शेअर करत असतात” असे मल्का यांनी सांगितले. एप्रिलमध्ये इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी कोरोना लसीचा शोध घेण्यास सुरुवात केली, दरम्यान त्यांना आता मोठा शोध लागल्याचे इस्रायली संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.

तत्पूर्वी इस्रायल संरक्षणमंत्री आणि इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात, कोरोना विषाणूचा नाश करण्यारी कोरोना लस (COVID 19 Vaccine) तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे सांगितले होते. तसचे, इस्रायलनं तयार केलेली ही लस कोरोनावर हल्ला करून रुग्णांच्या शरीरातून त्याचा प्रादुर्भाव कमी करेल. तसेच, या लसीचा शोध टप्पा संपला असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीनं अँटीबॉयटिक्स तयार केले जातील, इस्रायलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी याबाबत माहिती दिली होती.

नफताली बेनेट म्हणाले होते की, कोरोना व्हायरस लसीच्या (COVID 19 Vaccine) विकासाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट आता ही लस पेटंट करण्याच्या विचारात आहे. पुढील टप्प्यात, संशोधक व्यावसायिक उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधतील.तसेच या महान यशाबद्दल मला संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान असल्याचे देखील बेनेट यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे इस्रायलमधील संशोधकांच्या या दाव्यामुळे आता संपूर्ण जगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे इस्रायलचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतात इस्रायलकडून तंत्रज्ञान घेईल असं सांगण्यात येत आहे.

 

News English Summary: The Israel Institute of Biological Research has completed the development of a corona virus antibody or COVID 19 vaccine. Have clinical trials of this vaccine begun? Also, is there any information about the development of this vaccine? Ron Malka, Israel’s ambassador to India, was speaking on the issue.

News English Title: Story we will share COVID 19 Vaccine details with the India Israels Ambassador News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x