1 May 2024 5:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

कोरोना व्हायरस पर्ल हार्बर आणि ९/११ हल्ल्यापेक्षाही भीषण – डोनाल्ड ट्रम्प

corona virus, Pearl Harbour attack, 9/11 attack, US President Donald Trump

वॉशिंग्टन डीसी, ७ एप्रिल: कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत ७२ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १२ लाखाहून अधिक लोकांना लागण झाली आहे. कोरोनामुळे सुपर पॉवर असा उल्लेख केल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा उल्लेख करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा हल्ला पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयंकर असल्याचं सांगितलं आहे.

“आम्ही आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करत आहोत. कोरोनाचा हल्ला आतापर्यंत सर्वात भयानक हल्ला आहे. पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयानक आहे. आतापर्यंत अमेरिकेवर असा हल्ला झालेला नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. कोरोनामुळे अमेरिकेत लॉकडाउन असून अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत.

दरम्यान, अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ९ नोव्हेंबर २००१ रोजी अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास ३००० निष्पाप अमेरिकन नागरिकांचा जीव गेला होता. तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. ७ डिसेंबर १९४१ रोजी हा हल्ला करण्यात आला होता. सकाळी सात वाजून ५५ मिनिटांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या १८ युद्धनौका आणि १८८ लढाऊ विमानं नष्ट करण्यात आली होती. सोबतच २४०३ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता.

 

News English Summary: The corona has also hit the US economy, which is referred to as a superpower. Referring to the situation caused by the corona, Donald Trump said that the corona virus attack is worse than Pearl Harbor and 9/11.

News English Title: Story corona virus worse than Pearl Harbour 911 attacks US President Donald Trump News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x