15 May 2021 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

कोरोना जगात दिर्घकाळ राहणार | 78 कोटी लोकांच्या लसीकरणानंतरही वाढता प्रभाव - WHO

Tedros Adnom Gabiusus

वॉशिग्टन, १४ एप्रिल: कोरोना महामारीचा संसर्ग जगामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ॲडनोम गॅबियिसस यांनी कोरोनाचा संसर्ग जगात दिर्घकाळ टिकून राहण्याचा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी जगातील आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात आजघडीला 78 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून तरीदेखील कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

टेड्रोस यांच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आण‍ि सामाजिक अंतर राखले पाहिजे. जगात पुन्हा एकदा पुर्वीसारखा व्यापार आणि प्रवास पाहायला आवडेल असेही ते बोलताना म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन कर्खोवे यांनी सांगितले की, कोरोनाचे संसर्ग हे पहिल्यासारखे नसून त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस यांनी सांगितले की, कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण सर्वात मजबूत उपाय आहे. परंतु, यासोबतच मास्क, सामाजिक अंतर, स्वच्छता, चाचणी, आयसोलेशन हे पण तेवढेच गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

 

News English Summary: The Corona epidemic is spreading rapidly around the world. Against this backdrop, the Director-General of the World Health Organization, Tedros Adnom Gabiusus, has warned that corona infection may persist in the world. Tedros expressed concern over the growing corona issue in Asia and the Middle East. He further said that despite the fact that 78 crore people have been vaccinated in the world so far, the corona infection is not decreasing.

News English Title: Corona infection may persist in the world for long time said WHO director general Tedros Adnom Gabiusus news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1365)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x