कोरोनाचा कहर २ वर्ष सुरूच राहणार; अमेरिकन संशोधकांचा दावा
वॉशिंग्टन, ११ मे: कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील १८ ते २४ महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठीही तयार रहावे, असा सल्लाही त्यांनी जगभरातील सर्व सरकारांना दिला आहे.
अमेरिकेतील मिनेसोटा युनिव्हर्सिटीत सेंटर फॉर इंफेक्शियस डिसीज रिसर्च अँड पॉलिसीच्या वतीने ‘Covid-19 व्ह्यूपॉइंट’ नावाने हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन इन्फ्लुएंझा महामारीच्या मागील पॅटर्नवर आधारलेले आहे. डॉ. ख्रिश्चन ए. मूर (मेडिकल डायरेक्टर CIDRAP), डॉ. मार्क लिप्सिच (डायरेक्टर, सेंटर फॉर कम्युनिकेबल डिजीज डायनामिक्स, हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ), जॉन एम. बॅरी (प्रोफेसर, तुलाने युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ) आणि मायकल टी. ओस्टरहोम (डायरेक्टर, CIDRAP) यांनी हे संशोधन केले आहे.
जगभरात 1700च्या सुरुवातीनंतर आठ प्रकारच्या इन्फ्लुएंझा महामारी बघितल्या गेल्या आहेत. यापैकी चार तर 1900 नंतर आल्या आहेत. संशोधकांचा अंदाज आहे, की SARS आणि MERSचा विचार करता, SARS-CoV-2ची प्रकृती फार भिन्न आहे.
संशोधनानुसार, सध्या कोरोना व्हायरसचे पॅथोजन्स पाहता, त्याच्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा पूर्वानुमान लावाला जाऊ शकत नाही. इन्फ्लुएंझा व्हायरस आणि Covid-19 व्हायरसमध्ये फरक असला, तरी बरेच साम्यही आहे. हे वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. हे दोन्हीही प्रामुख्याने श्वसनाद्वारेच पसरतात. लक्षणे न दिसताही त्यांचा फैलाव होऊ शकतो. एवढेच नाही, तर ते लाखो लोकांना संक्रमित करू शकतात आणि संपूर्ण जगाला कवेत घेऊ शकतात. हे दोघेही नोव्हेल व्हायरल पैथोजन्स आहेत.
Covid-19 आणि इन्फ्लुएंझाच्या अँपिडेमियोलॉजीमध्ये मुख्य समानता आणि भिन्नता यांची ओळख करून घेऊन Covid-19 महामारीच्या काही शक्यतांचा अनुमान लावला जाऊ शकतो. मगील साथीच्या रोगांचा विचार करता, संशोधकांनी नोव्हेल कोरोना व्हायरसच्या तीन संभवित परिस्थितींचाही अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर ते या दोहोंमधील मुख्य फरकांकडेही लक्ष आकर्षित करतात. जे Covid-19ला अधिक घातक बनवतात.
नोव्हेल कोरोना व्हायरसचा इंक्यूबेशन पिरियड इन्फ्लुएंझापेक्षा अधिक आहे. कोरोना व्हायरसचे रिप्रोडक्शनही इन्फ्लुएंझा महामारीपेक्षा अधिक आहे. थंडी अथवा गरमीच्या दिवसांत मागील आजारांमध्ये फासरा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. संशोधकांनी अंदाज वर्तवला आहे, की पहिल्या परिस्थितीत २०२०’च्या वसंत ऋतूमध्ये Covid-19चे अधिक रुग्ण आढळतील. यानंतर गरमीच्या दिवसांत कोरोनाच्या अनेक छोट्या लाटाही येतील. अशीच परिस्थिती १-२ वर्ष राहील. मात्र हे सर्व, स्थानीय फॅक्टर्स, भौगोलीक आणि प्रतिबंधक उपाय यांवर अवलंबून असेल.
दुसऱ्या परिस्थितीत २०२०’च्या पाणगळ अथवा थंडीच्या दिवसांत कोरोनाची दुसरी आणि मोठी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पुढील वर्षांतही एक अथवा त्याहून अधिकि छोट्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणगळीच्या दिवसांत कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी चांगल्या उपायांची आवश्यकता आहे. हे १९१८-१९, १९५७-५८ आणि २००९-१० महामारी प्रमाणेच आहे. तिसऱ्या परिस्थितीत 2020च्या वसंत ऋतूत, Covid-19च्या पहिल्या लाटेनंतर सुरू असलेले संक्रमण आणि केसेस समोर येणे हळू हळू संपेल. मागील, इन्फ्लूएंझा महामारींमध्ये हा लाटेचा पॅटर्न नव्हता. मात्र, Covid-19चा विचार करता ही शक्यता नाकारता येत नाही, असेही संशोधनात म्हणण्यात आले आहे.
यासंदर्भात संशोधकांनी म्हटले आहे, की अधिकाऱ्यांनी उल्लेख केलेल्या दुसऱ्या परिस्थितीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने तयार राहावे. कारण ही सर्वात खराब स्थिती असेल. तसेच सध्या कुठल्याही प्रकारची व्हॅक्सीन अथवा हार्ड इम्युनिटी उपलब्ध नाही, असेच गृहित धरावे. या संशोधनात, असेही सांगण्यात आले आहे, की कोरोना लवकर संपणार नाही, हे गृहित धरूनच सरकारांनी तयार राहावे. तसेच, पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी तोंड वर काढण्याची शक्यता आहे, याचा विचार करून सरकारांना तयारी करावी लागेल.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी करोनावरील लस येण्यासाठी दोन वर्ष लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येकानं करोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष राजदूत डेव्हिड नाबारो यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला. या मुलाखतीत बोलताना नाबारो यांनी भारतानं करोनाविरोधात केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं. “भारतीय नागरिक करोनाशी जुळवून घेत जगू शकतो. अशाच पद्धतीच्या जीवनशैलीनं करोनाला बाजूला ठेवता येऊ शकतं. देशातील प्रत्येक नागरिकाला करोनाविषयी शिक्षित करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे,” असं नाबारो म्हणाले.
News English Summary: U.S. researchers say the Corona virus epidemic is likely to continue for the next 18 to 24 months. He has made this prediction after a research. Not only that, but for the next two years, Corona will continue to draw her mouth from time to time. He also advised all governments around the world to be prepared to face it.
News English Summary: Story corona virus will continue for next two years researchers prediction News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News