14 May 2021 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच.... मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट
x

कोरोना आपत्ती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

Dr babasaheb Ambedkar university

औरंगाबाद, १४ एप्रिल: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केले. यानुसार बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून १ मे २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत १४४ कलमांन्वये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आज CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०वीच्या परीक्षा रद्द केल्या असून १२वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. दरम्यान, १०वीच्या विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला असला तरी १२वीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेतून पुर्ण सुटका मिळाली नाही आहे.

त्यानंतर आता महाराष्ट्रातील विद्यापीठातून अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमाची परीक्षाही २७ एप्रिलऐवजी ५ मे पासून सुरू होणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा ७ एप्रिलपासून सुरळीतपणे सुरु झाली होती. तर परंपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून व ६ एप्रिलपासून अभियांत्रिकीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होत्या. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने पंधरा दिवस विविध निर्बंध लागू केले आहेत. या संदर्भातची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री केली.

या पार्श्वभुमीवर कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश परीक्षा विभागाला दिले आहेत. त्यामुळे १५ ते ३० एप्रिल होणारे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. आता ३ मे पासून उर्वरित पेपर घेण्यात येणार आहेत. तर पदवी तर अभ्यासक्रमाची २७ एप्रिल पासून होणारी परीक्षा आता ५ मे पासून सुरू होणार आहे. त्यांनी उर्वरित पेपर जास्तीत ऑनलाईन पद्धतीने द्यावेत, असे आवाहन परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी केले आहे.

 

News English Summary: Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University’s BA, B.Sc and B.Com engineering courses have been postponed till May 2. Also, examinations for other courses will start from May 5 instead of April 27.

News English Title: Dr babasaheb Ambedkar university exams have been postponed the degree paper 3 and the postgraduate news updates.

हॅशटॅग्स

#Education(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x