शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव, ४ कर्मचारी पॉझिटिव्ह
नवी दिल्ली, २१ ऑगस्ट : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज ही संख्या ४७३ झाली आहे. ५००च्या जवळपास पोहोचली आहे. पवारांच्या घरी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
गोविंद बागेतील जवळपास ५० कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यात स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी आज ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी १२ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता.
१९ ऑगस्ट रोजी रोजी घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या ३८ जणांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यापैकी माळेगाव येथील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे १९/ ८ /२० रोजी घेतलेल्या १३५ नमुन्यांपैकी एकूण कालचे चार व आजचे चार असे आठ जणांचा अहवाल RT-PCR पॉझिटिव्ह आलेला आहे.
News English Summary: Four employees of NCP president Sharad Pawar’s Govindbagh residence in Baramati have contracted corona. The number of corona positive patients in Baramati is increasing rapidly. The administration is saying that these employees are working in the fields and gardens.
News English Title: NCP President Sharad Pawar native place Baramati Govind Baug 4 people corona Positive found News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा