14 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी | मुंबईतील केईएम आणि नायर हॉस्पिटलची निवड

Corona Virus, Oxford covid19 vaccine, human trial, Mumbai Hospitals

मुंबई, १५ ऑगस्ट : कोरोनावरच्या ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी आता मुंबईतही होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी करार झाला आहे. भारतामध्ये ऑक्सफर्डची लस यशस्वी झाली तर त्याचं उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. कोव्हिशिल्ड या सिरमच्या लसीशीची चाचणी लवकरच भारतात सुरू होणार आहे. देशभरातल्या एकूण १० सेंटरमध्ये १६०० निरोगी लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे.

देशातल्या १० सेंटरपैकी मुंबईत केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलची या कोरोना चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. केईएम आणि नायर हॉस्पिटलमध्ये १६० स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी करण्यात येईल. आयसीएमआरच्या सूचनांनुसार या चाचण्या होतील. या चाचणीचा पहिला टप्पा इंग्लंडमध्ये पार पडला आहे. दुसरी चाचणी इंग्लंडमधील १० हजार लोकांवर सुरू आहे, तसंच अमेरिका आणि ब्राझील या देशातही या लसीची चाचणी घेण्यात येईल.

दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या करोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक – व्ही’ या करोना विषाणूवरील लसीचं उत्पादन सुरू करण्यात आल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुढील वर्षभरात करोना विषाणूच्या लसीचे देशात ५० कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार करण्यास सक्षम असल्याचं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

News English Summary: The Oxford vaccine on corona will now be tested in Mumbai. Oxford University has an agreement with the Serum Institute of Pune. If the Oxford vaccine is successful in India, it will be produced by the Serum Institute.

News English Title: Corona Virus Oxford covid19 vaccine human trial in Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x