14 December 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

जिलेटिन स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीच्या त्या व्यक्तीची चौकशी कधी? | त्यांच्या हेतूची चौकशी का नाही?

MP Kumar Ketkar, Gelatin supplier, Rajyasabha, Sachin Vaze

नवी दिल्ली, १८ मार्च: मुकेश अंबानींचे घर अँटिलिया समोर स्फोटके सापडणे आणि नंतर या प्रकरणासंबंधीत मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे. या प्रकरणाचा खुलासा लवकरच होणार असल्याचे मानले जात आहे. स्फोटके प्रकरणाचा तपास नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी (NIA) आणि मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अँटी टेररिज्म स्क्वाड (ATS) करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएची टीम या प्रकरणात सह पोलिस आयुक्त (क्राइम) मिलिंद भारंबे आणि उप पोलिस आयुक्त (क्राइम) प्रकाश जाधव यांचे जबाबही नोंदवेल. NIA हे जाणून घ्यायचे आहे की कुणाच्या सांगण्यावरुन वाझेंना स्कॉर्पिओ प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. NIA भारंबे आणि जाधव यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचे मानते.

दरम्यान, सचिन वाझे प्रकरण आणि NIA चौकशीचा मुद्दा आज राज्यसभेत देखील उचलण्यात आला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. मात्र या प्रकरणात ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटिन तयार झाले, ज्यांनी याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाही, या जिलेटिन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरासाठी १५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे जिलेटिन कोणी पुरवलं? कोणत्या हेतूने हे जिलेटिन दिलं होतं? याचीही चौकशी होणं गरजेचे आहे अशी मागणी कुमार केतकर यांनी राज्यसभेत केली.

तसेच कुमार केतकर पुढे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात २ प्रकरण गाजत आहेत, त्यात स्थानिक पोलीस आणि NIA तपास करत आहेत, एक म्हणजे लोकसभेचे विद्यमान खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली, डेलकर हे ७ वेळा खासदार राहिले होते, त्यांच्या सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे मोहन डेलकरांनी मुंबईत आत्महत्या केली कारण त्याचं दीव-दमण आणि इतर राज्यातील सरकारवर विश्वास नव्हता असं त्यांनी सांगितलं.

 

News English Summary: In the case, the Nagpur-based company in which the gelatin was made, why the people who supplied it are not investigated, the person who made the gelatin has donated Rs 15 crore for the Ram temple in Ayodhya through the Vishwa Hindu Parishad. So who supplied the gelatin? For what purpose was this gelatin given? Kumar Ketkar demanded in the Rajya Sabha that this too needs to be investigated.

News English Title: MP Kumar Ketkar talked on Nagpur gelatin supplied company in Rajyasabha news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x