26 April 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यास सरकारने नकार दिल्याने विनायक मेटेंचा संताप

Shivsangram leader Vinayak Mete, Special assembly session, Maratha reservation

मुंबई, २८ जुलै : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले असून, आता अधिवेशन ०७ सप्टेंबर २०२० रोजी बोलाविण्यात येईल, असा निर्णय आज विधान भवन मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी राजभवनमधील २४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं उपाययोजना राबवल्या आहेत. येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलले गेले आहे. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी होणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले होते.

या सर्व बाबींवर उद्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन ७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घ्यायला सरकारही तयार नव्हते. आधीच सरकारमधील काही मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यात अधिवेशन घेऊन सरकार धोका पत्करू इच्छित नसल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असतानाच राज्यातील विरोधक सरकारविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी आज जामकर सल्लागार समितीच्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. मात्र मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही, अशी भूमिका सरकारच्यावतीने मांडल्यामुळे विनायक मेटे यांनी बैठकीतून सभात्याग केला. कालच खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या विषयात राजकारण करु नये, असा सल्ला सरकारला दिला होता.

 

News English Summary: Shiv Sangram Party MLA Vinayak Mete today demanded a two-day special session for Maratha reservation at a meeting of the Jamkar Advisory Committee. However, Vinayak Mete resigned from the meeting as there was no need to hold a special session for Maratha reservation.

News English Title: Shiv Sangram leader Vinayak Mete demands special assembly session for Maratha reservation News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x