15 May 2021 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल

FIR against Rhea Chakraborty, Bollywood actor Sushant Singh Rajput, Suicide case

पटना, २८ जुलै : सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान काल चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात चौकशी सुरू असून या प्रकरणातला मंगळवारी पटना पोलिसांनी FIR दाखल केला आहे. पाटण्याच्या राजीवनगर पोलीस स्थानकात सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यावर FIR दाखल केली आहे. या प्रकरणात आजपर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. यामध्ये चित्रपट सृष्टीतल्या महेश भट्ट यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा देखील समावेश आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून हे जबाब नोंदवले जात असताना पाटणा पोलिसांनी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्तीवर सुशांतला प्रेमात फसवून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. दरम्यान, रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून ४ पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं आहे.

 

News English Summary: Actor Sushant Singh Rajput’s suicide case has been under investigation since last month and an FIR was lodged by Patna police on Tuesday. Police have registered an FIR against Rhea Chakraborty after Sushant Singh Rajput’s father lodged a complaint against her at the Rajivnagar police station in Patna.

News English Title: FIR against Rhea Chakraborty in Bollywood actor Sushant Singh Rajput suicide case News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x