7 May 2021 10:05 AM
अँप डाउनलोड

.. तरीही गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा, मुख्यमंत्र्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Maharashtra lockdown

मुंबई, १५ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर देखील लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. स्थानकात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग दिसून आली नाही. तिकीट खिडक्यांवर देखील सर्वांना टिकीट दिली जात आहे. तसेच आरपीएफ आणि जीआरपी देखील प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यू आर कोड तपासताना आढळून आले नाहीत. याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडून रेल्वेला कोणत्याही प्रकारचे आदेश अजूनही प्राप्त झालेले नाहीत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्य सरकारने स्थानकात कोणाला प्रवेश घ्यावा आणि कोणाला देऊ नये या संदर्भातल्या लेखी आदेश रेल्वेला दिले नाहीत. तसेच यावेळी निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीला देखील बोलावले गेले नव्हते. त्यामुळे रेल्वे स्थानकात घेणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश दिला जात आहे. तिकीट खिडक्यांवर देखील घेण्यासाठी आलेल्या सर्वांना तिकीट दिले जात आहे. त्यामुळे या कडक निर्बंधांचा काही उपयोग होईल का अशी शंका आहे.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले आहेत. राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासनाने दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक साहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

 

News English Summary: The restrictions imposed to break the corona chain will be strictly enforced by all collectors and the police. Chief Minister Uddhav Thackeray has instructed the district collector-police administration to shut down essential services in case of congestion.

News English Title: State govt may close down essential services too if peoples will not follow rules news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(375)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x