23 November 2019 8:03 AM
अँप डाउनलोड

एकीकडे वडापाव'मध्ये 'पाल', तर आज पुण्यात समोशाच्या गोड चटणीत मेलेला 'उंदीर'

पुणे : मागील काही दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर येथील एका स्नॅक्स’च्या दुकानात वडापावमध्ये मेलेली पाल आढळली होती. तर आज पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल जवळील शारदा स्वीट सेंटरमध्ये समोशाच्या गोड चटणीत मेलेला ‘उंदीर’ आढळला आहे. परंतु यादी तीच गोड चटणी किती जण घेऊन गेले आणि खाल्ली असावी याचा काहीच अंदाज नाही.

पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाने नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उंदीर आढळल्याचा व्हिडिओ देखील समोर आला असून मेलेला उंदीर ज्या चटणीत सापडला ती चटणी अनेकांनी याआधी खाल्ल्याचे समोर येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सध्या बाहेरील पदार्थ खाताना असे प्रकार रोजच अनुभविण्यास येत आहेत.

चतुर्थीच्या निमित्ताने अनेकांनी होलसेल मध्ये हे सामोसे आणि चटणी खरेदी केले होते. त्यातील अनेकांनी ते खाल्ले सिद्ध असावेत असा अंदाज आहे. परंतु ही म्हणजे खवय्यांच्या जीवाशी तसेच आरोग्याशी केली जाणारी हेळसांड म्हणावी लागेल. परंतु खवय्यांनी स्वतःच आता बाहेरील फास्ट फूड खाणे टाळणे हाच एक उपाय सध्यातरी दिसत आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या