27 July 2024 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मुंबईत २६ जानेवारी रोजी संविधान बचाव सत्याग्रह.

मुंबई : मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया कडील छत्रपती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत २६ जानेवारीला लॉंग मार्च चे आयोजन होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सर्वपक्षीय आणि अनेक सामाजिक धुरिणांनी ‘संविधान बचाव सत्याग्रह’ आंदोलन पुकारलं आहे. या लॉंग मार्च मध्ये हार्दिक पटेल, शरद पवार, सीताराम येचुरी यान सारखे बडे राजकारणी आणि अनेक समाजसेवक उपस्थित राहणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून हा संविधान बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया कडील छत्रपती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत २६ जानेवारीला लॉंग मार्च चे आयोजन होणार आहे.

या मोर्च्याला स्वतः राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तुषार गांधी, सीताराम येचुरी, शरद यादव, गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर, पाटीदार नेता हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायाधीश बी . जी. कोळसे पाटील आणि गणेश देवी अशी बडी नावे आपली उपस्थिती दाखवणार आहेत.

२६ जानेवारीला मार्च पूर्ण झाल्यावर २ तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे, परंतु काँग्रेस कडून उपस्थितीबद्दल अजून पर्यंत कोणतीही प्रतिक्रिया कळू शकली नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x