आगामी काळात मनसेला सोबत घेणार नाही | फडणवीसांचं वक्तव्य
मुंबई, २४ नोव्हेंबर: शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sirnaik) यांच्या घरावर ईडीने (Enforcement Department) छापा टाकल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. ईडीकडे तक्रारी असतील म्हणून छापे टाकले असतील असे फडणवीस म्हणाले. ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरु नये असेही ते पुढे म्हणाले.
वीजबिल (Electricity Bill) मुद्द्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. थकबाकी त्यांच्याही काळात होती आमच्याही काळात होती. शेतकऱ्यांकडून बिल वसूल केलं जातंय अशी सावकारी पद्धत आमच्याकडे नव्हती असे ते म्हणाले.
हे सरकार पडेल आणि आम्ही सरकार स्थापन करु असे विधान भाजप नेते रावसाहेब दानवेंनी (BJP MP Raosaheb Danve) केले होते. यावर देखील फडणवीसांनी भाष्य केलंय. आम्ही विरोधीपक्ष आहोत. ते काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय. या राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. नाहीतर हे सरकार जनतेची पिळवणूक करेल. आम्ही सत्तांतराकडे डोळे लावून बसलो नाहीत. ज्या दिवशी सरकार जाईल त्यादिवळी महाराष्ट्राला सक्षम पर्याय आम्ही देऊ असे ते म्हणाले.
राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले आहे. राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असेही फडणवीस म्हणाले. तसेच आगामी काळात मनसेला सोबत घेणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
News English Summary: After the ED (Enforcement Department) raided the house of Shiv Sena leader Pratap Sirnaik, various reactions have started coming from political circles. Opposition leader Devendra Fadnavis also reacted. Fadnavis said the raids were carried out as the ED had complaints. He added that those who did not make a mistake should not be afraid.
News English Title: Opposition leader Devendra Fadnavis talked on alliance with MNS party news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा