12 December 2024 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

हे छापे नसून, केवळ झाडाझडती आहे | ईडीचं स्पष्टीकरण

Not raids, Bushes ED, MLA Pratap Sarnaik

मुंबई, २४ नोव्हेंबर: विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक निघून गेलं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबई घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आरोप – प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे.

सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे छापे नसून, केवळ झाडाझडती आहे, असे ईडीने स्पष्ट केले आहे. एका प्रकरणात केवळ धागेदोरे हाती लागल्याने हे सर्च ऑपरेशन राबवले आहे, असे सांगण्यात येत आहे.

मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारवाईचं स्वागत केलं आहे.

 

News English Summary: Sarnaik’s home and offices were raided by ED officials in the morning. However, these are not raids, they are just bushes, the ED explained. In one case, the search operation was carried out as only threads were found.

News English Title: These are not raids they are just bushes ED explained News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x