19 January 2022 12:50 AM
अँप डाउनलोड

स्वदेशी बनावटीची करंज पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल.

मुंबई : स्वदेशी बनावटीची करंज पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. या स्वदेशी बनावटीच्या करंज पाणबुडीची एकूण लांबी ६७.५ मीटर आणि उंची १२.३ मीटर इतकी असून एकूण वजन १५६५ टन इतकं आहे.

स्कॉर्पिअन श्रेणीतील ही तिसरी पाणबुडी असून त्याचं नामकरण ‘करंज’ असं करण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद अधिक झाली असून, मुंबईमधील माझगांव डॉक मध्ये या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘करंज’ पाणबुडीचं जलावरण करण्यात आलं.

संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘करंज’ पाणबुडीचं डिझाईन असं करण्यात आले आहे की, ही पाणबुडी प्रत्येक प्रकारच्या युद्धाला उपयुक्त आणि शत्रूला संहारक ठरू शकते. या अत्याधुनिक पाणबुडीतून शत्रूवर अचूक मारा करणं अगदी सहज शक्य झालं आहे. कलवरी, खांदेरी आणि त्यात आता करंज पाणबुडीने भारतीय नौदलाचे सामर्थ अधिक वाढले आहे. हा जलावरण सोहळा भारतीय नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत मुंबई डॉकयार्ड येथे पार पडला. मेक इन इंडिया अंतर्गत ऐकून अशा एकूण ६ पाणबुड्या बनविण्यात येणार आहेत.

हॅशटॅग्स

#Indian Navy(3)#INS Karanj(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x