26 May 2022 11:53 PM
अँप डाउनलोड

पुण्यातील भीमा-कोरेगांव घटना आणि राज ठाकरेंचे अप्रतिम व्यंगचित्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरून आणखी एक व्यंगचित्र प्रसिध्द केलं. सरकार आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणारी व्यंगचित्र काढली होती. परंतु आज त्यांनी काही दिवसांपूर्वीच घडलेल्या भीमा-कोरेगांव घटनेवर व्यंगचित्र प्रसिध्द केलं.

भीमा-कोरेगांव संदर्भात थेट भूमिका या व्यंगचित्रात नसली तरी राजकारणी कसे जाती – जातींमध्ये कसे जनतेला विभागतात हे दाखवण्याचा प्रयत्नं या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी केला आहे. केवळ एका दिवसातच जवळ जवळ ७ हजार शेअर झाले असून त्याच्या व्यंगचित्रकारांना समाज माध्यमांतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या व्यंगचित्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कॅप्शनमध्ये ‘फटकारे’ शब्द वापरला असून त्याला कोट ही केलं आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा ‘फटकारे’ हा व्यंगचित्र संग्रह मागे प्रकाशित झाला होता. ज्यामुळे वाचकाला पुन्हां बाळासाहेबांचे त्या फाटकाऱ्यांची ही आठवण त्या निमित्ताने झाली आहे.

सौजन्य : राज ठाकरे यांचे अधिकृत फेसबुक पेज

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x