13 December 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

वाह! मोदीजी वाह! कोणती आई मुलाला सांगते...बाळा! भरपूर लाच घे.. खूप पाप कर?

नवी दिल्ली : आगामी लोकसभेच्या निमित्ताने काही पेड प्लॅटफॉर्मच्या मार्फत प्रसार माध्यमांकडे भावनिक बातम्या पोहोचविण्याचे प्रकार रोज दिसू लागले आहेत. त्यात जवळची नाती सुद्धा मार्केटिंगसाठी वापरली जात आहेत असंच म्हणता येईल. भावनिक राजकारण्याचा नावाने लष्कर आणि नाती मागील ५ वर्षात सर्वाधिक राजकीय फायद्यासाठी वापरली गेली आहेत. तसेच काहीसा प्रकार, ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया पेज ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जे सांगितलं, त्यातून पुन्हा समोर आला आहे.

सर्वप्रथम समाज माध्यमांवरील कोणीही फुकट आणि फेक नावाने सुद्धा बनवू शकणाऱ्या एखाद्या पेजला पंतप्रधान मुलाखत देतात, हेच मुळात हास्यास्पद आहे. त्यातील मुलाखती दरम्यान मोदींनी स्वतःच्या जन्मदात्या आई हिराबेन यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात त्यांनी आईने दिलेले कानमंत्र सुद्धा सार्वजनिक केले आहेत.

त्यामध्ये नरेंद्र मोदी आईबद्दल सांगतात की, ‘तू काय करतोस हे मला कळत नाही…पण तू कधीच लाच घेणार नाही असं आश्वासन दे’, असं हिराबेन मोदी यांनी नरेंद्र मोदींना सांगितलं होतं. स्वत: नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, मोदींनी यावेळी बोलताना अजून एका गोष्टीचा खुलासा केला. मी पंतप्रधानपदाची शपथ घेणं हा तिच्यासाठी सर्वात जास्त आनंदाचा क्षण नव्हता. पण ऐकून आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. पण नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे आपण पंतप्रधान झालो, त्यापेक्षाही अधिक आनंद आईला तेव्हा झाला जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो. यानित्ताने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आईची भेट घेतल्याची ती आठवण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी सांगितली.

दरम्यान, आपल्याला गुजरातचं मुख्यमंत्रीपद मिळणार आहे कळलं तेव्हा आपण दिल्लीत होतो अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. शपथविधी पार पडण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये घरी जाऊन आईची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी अहमदाबादला पोहोचले तेव्हा सगळीकडे सेलिब्रेशन सुरु होते. हिराबेन मोदी यांना आधीच आपला मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होणार असल्याचं कळलं होतं.

‘पण माझ्या आईने फक्त माझ्याकडे पाहिलं आणि मिठी मारली. नंतर म्हणाली तू आता गुजरातला परतलास याचा सर्वात जास्त आनंद आहे. आईचा स्वभाव असाच असतो. आजुबाजूला काय सुरु आहे याचं तिला काही नसतं फक्त आपलं मूल आपल्या जवळ असावं इतकीच अपेक्षा असते’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

वास्तविक अशा भावनिक आठवणींनी आगामी लोकसभा नाहून निघणार आहेत याची झलक मोदींनी देण्यास सुरुवात केली आहे. पण आईच्या आठवणी आणि शिकवण सांगताना त्यांनी सर्व आईमध्ये आढळणारी एक सामान्य आई आधी समजून घेतली पाहिजे. जी जन्म दिलेल्या मुलाला कधीच बाळा! भरपूर लाच घे.. खूप पाप कर! असे कानमंत्र देत नाही. अगदी कितीही गरीब किंवा श्रीमंत असली तरी.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x