6 December 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024 IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल
x

पालघर प्रचारातील युतीचा कलगीतुरा अगदी २०१४ प्रमाणे?

पालघर : सत्तेतीलच दोन वाटेकरी पक्ष पालघर निवडणुकीतील प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक करण्यात कोणती सुद्धा कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीत. त्याचाच प्रत्यय काल शिवसेनेच्या प्रचारादरम्यान आला आहे. कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप ऐकवली.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही ऑडिओ क्लिप असल्याने सर्वत्रच त्याची चर्चा झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या नेत्या, कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड भेद रणनितीनुसार चालण्याचे आवाहन करत आहेत. भाजपला ही प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल तसेच विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे असे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सांगत आहेत.

पुढे त्या ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस असं बोलत आहेत की, आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकतीने खंबीरपणे उभा आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाने हे सर्व आरोप फेटाळले असून त्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड झाल्याचे म्हटले आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघरमध्ये २ सभा होत आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या या आरोपांना मुख्यमंत्री जशास तसे उत्तर देतील असं म्हटलं जात आहे. कालच भाजपचे लोक पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता आणि काही लोकांना
ताब्यात सुद्धा घेण्यात आलं होत.

परंतु सत्तेतील हे दोन वाटेकरी असलेले पक्ष सामान्य जनतेला पुन्हां २०१४ मधील त्याच प्रचार तंत्राची आठवण करून देत आहेत. शिवसेना – भाजप एकमेकांवर विकोपाला जाऊन टीका करतील आणि नंतर सत्तेत एकत्र नांदतील. कालांतराने दोन्ही पक्षांमध्ये सर्व काही आलबेल होताना दिसेल जसं २०१४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्यय आला होता.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x