25 June 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 26 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell? RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
x

गुजरात भाजपमध्ये होणार राजकीय भूकंप ही अफवा: नितीन पटेल

अहमदाबाद : गुजरात भाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची बातमी समाज माध्यमांवर पसरत होती. परंतु स्वतः उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ट्विट करत ती अफवा असल्याचे म्हटलं आहे. गेले २-३ दिवस ही बातमी समाज माध्यमांवर पसरत होती. काय होती ती बातमी ते सविस्तर वाचा.

गुजरात विधानसभेतील भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या खाते वाटपावरून अनेक कुरबुरी आहेत. विशेष म्हणजे त्या नाराज मंत्र्यांचे आणि आमदारांचे नैतृत्व विद्यमान उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे करत असल्याचं दिल्लीतील नेत्यांच्या आधीच ध्यानात आलं आहे. त्यासाठीच उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचीच विजय रूपांनी मंत्रिमंडळातून गच्छंती करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं त्या बातमीत सांगण्यात येत होत.

संभाव्य हालचालींचा दिल्लीश्वरांना वेळीच सुगावा लागला असून त्यासाठी आधीच डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्नं सुरु केले असून, त्याची जवाबदारी मुख्यमंत्री विजय रूपांनी यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या गटातील नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पक्ष शिस्तभंगाची कारवाई आड गुजरात विधानसभेतील वरिष्ठ नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नं करत आहेत. परिणामी आम्हाला मंत्रिमंडळातून वगळण्याचा शिस्तबद्ध प्रयत्नं सुरु आहे असं ते बोलत आहेत असं त्या बातमीत पसरविण्यात येत होत.

गुजरात मधील नितीन पटेल, बाबू बोखिरिया, पुरुषोत्तम सोलंकी आणि सी.के. राउलजी यांच्यासह आणखी तीन ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे समजते. हा गट भाजमधून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहे. विद्यमान भाजप सरकारचा बहुमताचा आकडा कमी करून, सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणायची योजना ते आखात असल्याचे दिल्लीत समजले होते असं त्या बातमीत व्हायरल करण्यात येत होत.

त्यानंतर वेगाने हालचाली सुरु झाल्या असून नाराजांची समजूत काढण्याची जवाबदारी स्वतः मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना देण्यात आली आहे. विषय अधिक गंभीर वळणावर जाऊ नये म्हणून भाजप सर्व प्रकारचे प्रयत्नं करत आहे. दोन दिवसांपूर्वीच बाबू बोखिरिया यांच्याशी मुख्यमंत्री विजय रूपांनी यांची एक गुप्त बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना लवकरच तुमच्या समस्या सोडविल्या जातील आणि मंत्रिमंडळातील चांगली खाती बहाल केली जातील असं आश्वासन दिल आहे. परंतु त्यातील पुरुषोत्तम सोलंकी आणि सी. के राउलजी यांची अजून मुख्यमंत्री विजय रूपांनी यांच्यासोबत भेट झालेली नसल्याचं बातमीत पसरविण्यात येत होत.

राउलजी हे शंकरसिंह वाघेला गटातील एक असले तरी त्यांनी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. याच गटातील एका नेत्याच्या माहितीप्रमाणे विद्यमान उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत सुमारे २५ आमदारांचा गट जायला तयार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून नितीन पटेल यांची मुख्यमंत्रीपदाची लालसा लपून राहिलेली नाही. त्यामुळे गुजरातमधील या मोठ्या राजकीय हालचालींचा सुगावा काँग्रेसला लागतच त्यांनी नितीन पटेल यांच्या बंडाला हवा द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेस सुद्धा गुजरातमध्ये कर्नाटक नीती वापरून सरकार पाडण्याची स्वप्नं पाहू लागली आहे. दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांना हे लक्षात येताच दिल्लीतून सुद्धा ‘ऑपरेशन नितीन’ फेल करण्यासाठी पडद्याआड जोरदार तयारी सुरु असल्याचे समजते. अशा आशयाच्या बातम्या समाज माध्यमांवर फिरत होत्या, त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

या सर्व अफवा असल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ट्विट द्वारे प्रसिद्ध केलं आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x