30 November 2022 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

नाशिकमध्ये भुजबळांची मदत एनसीपीला की सेनेला ?

नाशिक : आज विधानपरिषदेचे निकाल जाहीर झाले असून, त्यात नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना आणि भाजपने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला असताना सुद्धा शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे तब्बल २०० मतांनी विजयी ठरले आहेत. परंतु आता स्वतः नरेंद्र दराडे यांनी विजयामागे एनसीपीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मदत लाभली असा दावा केला आहे.

कारण मतदानापूर्वी नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा विजय सोपा झाल्याचे चित्र होते. परंतु तसे तर्क लावले जात असताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंनी २०० मताधिक्याने विजय संपादन केला आहे.

शिवसेनेच्या विजयाने राष्ट्रवादीला धक्का बसला खरा, पण सेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनीच आपल्या विजयामागे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मदत लाभल्याचे सांगितल्याने राजकीय विश्लेषक निरनिराळे तर्क लावू लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी भुजबळ तुरुंगातून सुटल्यानंतर पंकज भुजबळ ‘मातोश्री’वर भेटीला गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यावरूनच भुजबळांची जवळीक वाढताना दिसत होती. त्यामुळेच नरेंद्र दराडे यांनी जो दावा केला आहे तो पूर्णपणे नाकारता सुद्धा येत नाही.

राजकीय विश्लेषकांकडून असं म्हटलं जात आहे की, शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली खरी, तसेच पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल असं बोलू लागले. परंतु वास्तविक शिवसनेंकडे मुख्यमंत्रीपदाचा राज्यस्तरावरील एकही चेहरा नसून त्यामुळेच शिवसेना भुजबळांशी आणि भुजबळ शिवसेनेशी जवळीक वाढवत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीने नरेंद्र दराडेंचा हा दावा फेटाळून लावला असून उलट भाजपनेच शिवसेनेला मदत केल्याचं सांगितलं.

हॅशटॅग्स

#NCP(372)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x