12 August 2020 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळामुळे निधन

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवरील एक ‘बंडखोर’अभिनेत्री’ म्हणून त्या सर्वश्रुत होत्या. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात जन्म झाला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कुटुंबात एक भाऊ, सहा बहिणी आणि आई व वडील असे त्यांचा परिवार होता. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील एकही व्यक्ती अभिनय क्षेत्रात नव्हते. शिक्षण गिरगावातील ‘राममोहन’ शाळेत पूर्ण केले आणि सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेतच दुसऱ्याबाजूला एका खासगी कंपनीत नोकरी देखील करत होत्या. त्यांनी काही काळ मुंबईत कामगार आयुक्त कार्यालयात सुद्धा नोकरी केली होती. ‘आयएनटी’च्या स्पर्धेदरम्यान महाविद्यालया तर्फे सादर करण्यात आलेल्या एका नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेमुळे त्या नाट्यक्षेत्राकडे वळल्या असा त्यांचा एकूण प्रवास आहे.

नाटकांमधून काम करताना केवळ मनोरंजन न करता त्यामधून एखादा सामाजिक संदेश देण्यावर लालन सारंग यांनी अधिक भर दिला. कमला, सखाराम बाईंडर, गिधाडे, रथचक्र या नाटकांतील त्यांच्या भुमिका विशेष गाजल्या आणि त्या प्रकाश झोतात आल्या होत्या.

सारंग यांच्या गाजलेल्या कलाकृती म्हणजे आक्रोश (वनिता), आरोप (मोहिनी), उद्याचा संसार, उंबरठ्यावर माप ठेविले, कमला (सरिता), कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय), खोल खोल पाणी (चंद्राक्का), गिधाडे (माणिक), घरकुल, घरटे अमुचे छान (विमल), चमकला ध्रुवाचा तारा, जंगली कबुतर (गुल), जोडीदार (शरयू), तो मी नव्हेच, धंदेवाईक (चंदा),  सखाराम बाइंडर (चंपा) अशा एक ना अनेक नाटकं त्यांनी गाजवली.

दरम्यान, लालन सारंग ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने सन्मानित, त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५) आणि २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२४ जानेवारी, २०१७)

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Pune(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x