9 October 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर

Sangli Kolhapur Flood, MNS, Raj Thackeray, Sharmila Thackeray

मुंबई: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते तर खुद्द मुख्यमंत्री महाजानदेश यात्रेत मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? राज्यात एवढा पूर आला की कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे, ते पुण्यातल्या कसब्यातील सभेत बोलत होते. कोथरूड मतदारसंघातून यंदा भाजपानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांवर लादल्याची टीका करण्यात येत होती. मनसेने कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

राज ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना चंद्रकात पाटील यांनी राज ठाकरे यांनाच प्रश्न विचारला. कोल्हापुरात पूर आला तेव्हा मी तिथं पाय रोवून उभा होतो. तब्बल ५ लाख लोकांचं स्थलांतर केलं. राज ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. भाजपनं आज विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र प्रसिद्ध केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राज ठाकरेंना प्रतिप्रश्न केला.

वास्तविक स्वतः शर्मिला ठाकरे यांच्यासहित संपूर्ण मनसेचं मदतीच्या साहित्यासहित सांगली कोल्हापूरमध्ये होती याचा चंद्रकांत पाटील यांना विसर पडला असावा. शर्मिला ठाकरे सर्वप्रथम सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ या गावाला भेट दिली होती. त्यानंतर त्या सांगली शहरातील पुरग्रस्तांशी भेटून समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर त्या मिरज शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला भेट देण्यासाठी रवाना झाल्या होत्या.

त्यात शर्मिला ठाकरे यांनी पुरात मोठं नुकसान झालेल्या कराड येथील पाटण कॉलनीला भेट देऊन तिथल्या पुरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. त्यावेळी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच आम्हाला मदत केल्याचं गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं. तसेच सांगली तसेच कोल्हापुरातील अनेक भागात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तळ ठोकून होते. मुंबई आणि संपूर्ण राज्यातील मनसेच्या शाखांमधून जवळपास महिनाभर गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने पाठवला जात होता आणि त्यात स्थानिक कार्यकर्ते मोठ्या सहभागाने मदतीसाठी मैदानात उतरले होते.

राज्यातील सत्ताधारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निरनिराळ्या यात्रा काढण्यात पुन्हा व्यस्त झाले असताना, ते केवळ घोषणा करून आणि तुटपुंज्या मदत जाहीर करून भरमसाट जाहीरबाजी करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी तर फिरकले देखील नव्हते आणि मुख्यमंत्र्यांना प्रसार माध्यमांनी गांभीर्य लक्षात आणून दिल्यावर त्यांनी काही दिवसांसाठी महाजानदेश यात्रा थांबवली होती. अमित शहा तर विमानातूनच पाहणी करून थेट कर्नाटकाच्या भूमीत लँड झाल्याचं दिसलं. मात्र त्या तुलनेत विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी सांगली आणि कोल्हापूरकरांच्या मदतीला धावले होते हे वास्तव आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x