29 April 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

पोलमध्ये प्रश्न 'महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कोण सर्वाधिक लोकप्रिय?' शिंदे की फडणवीस? प्रतिक्रिया पाहून शिंदे-फडणवीस पुन्हा जाहिरात देणार नाहीत

Shinde-Fadnavis

Maharashtra Advertisement Politics | काल शिवसेनेच्या एका जाहिरातीमुळे भाजपमध्ये नाराजी पसरली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. एका सर्वेक्षणाचा आधार देत एकनाथ शिंदे यांचा जाहिरातीत उत्कृष्ट मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे यामध्ये किती टक्के उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती हे देखील नमूद करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना शिंदेंपेक्षा कमी टक्केवारीची पसंती दाखवण्यात आली आहे. या जाहिरातीवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखविण्यात आला होता. तसेच ‘आम्ही मोदींची माणसं’ आहोत असा जाहीर शब्दप्रयोग करणारे एकनाथ शिंदे यांच्या या जाहिरातीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा स्थान देण्यात आलं नव्हतं.

परिणामी, ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’ या जाहिरातीने भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडली. भाजपमधून नाराजीचा सूर उमटला आणि पडद्यामागेही बऱ्याच घटना घडल्या. या सगळ्या नाट्यानंतर ती जाहिरात शिवसेनेने दिली नाही, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला. पण, या जाहिरातीमुळे भाजपमधून उमटलेल्या नाराजीच्या सूराचं ‘डॅमेज कंट्रोल’ जाहिरातूनच करण्यात आलं. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा फोटोही झळकला आणि लोकप्रियतेचा मुद्दाही गायब झालेला दिसला आहे.

आता माध्यमांच्या पोलमधून शिंदे-फडणवीसांच्या विरोधात ९९ टक्के जनता
दरम्यान, आता याच विषयाला अनुसरून अनेक माध्यमांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोल टाकत त्यात ‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कोण सर्वाधिक लोकप्रिय?’ शिंदे की फडणवीस असं प्रश्न करत लोकांच्या प्रतिक्रिया मागविण्यास सुरुवात केली आहे. ‘मुंबई तक’ या टीव्ही वृत्तवाहिनेने देखील त्यांच्या युट्युब चॅनलवर लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहे. यामध्ये ९९ टक्के लोकं शिंदे-फडणवीस या दोघांच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय. यावर हजारो प्रतिक्रिया शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात उमटत असताना त्या प्रतिक्रियांवर देखील शेकडो लाईक्स येतं आहेत हे अजून विशेष म्हणावे लागले. या प्रतिक्रिया शिंदे-फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांनी वाचल्यास त्यांना निवडणुकीत काय होणार याचा अंदाज येऊ शकतो. या पोलमध्ये तिसरा पर्याय न दिल्याने लोकं कमेंट्स मधून उत्तराचा पाऊस पाडत आहेत.

तो पोल तुम्ही स्वतः देखील येथे पाहू शकता: येथे क्लिक करा

News Title : Shinde-Fadnavis advertisement politics poll peoples reactions check details on 14 June 2023.

हॅशटॅग्स

#Shinde-Fadnavis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x