11 April 2021 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पुणे पोलीस दलातील राठोड दाम्पत्यावर रश्मी शुक्लांनी बेकायदेशीर कारवाई केली होती - हरिभाऊ राठोड

IPS Rashmi Shukla, illegal action, Rathod couple, Haribhau Rathod

पुणे, ०२ एप्रिल: राज्यात फोन टँपिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण तापला होताआहे. त्यात राज्य सरकारला मुख्य सचिवांनी अहवाल सादर केल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने गृह विभागाकडून मान्यता घेतली होती आणि तीच त्यांनी सरकार विरोधात वापरल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. पुण्यातील खंडणीप्रकरनानंतर आता रश्मी शुक्ला यांचावर अजून एक आरोप करण्यात आला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई दिनेश राठोड आणि पत्नी तारकेश्‍वरी राठोड हे खेळाडू आहेत. त्यांनी नेपाळ सरकार मान्यता प्राप्त मकालू ऍडव्हेन्चर प्रा.लि. यांच्यामार्फत एव्हरेस्ट मोहीमेत सहभाग घेतला होता. तसेच, ती यशस्वी पूर्ण केली. परंतु, ठाणे येथील अंजली कुलकर्णी यांच्या संबंधित मोहीम बनावट असल्याच्या तक्रारीची दखल घेत तत्कालीन पोलीस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी त्यांचे निलंबन केले. चौकशीच्या नावाखाली वारंवार बजावलेल्या समजपत्रामुळे नऊ महिन्यांचे गरोदर असलेल्या तारकेश्‍वरी यांचा गर्भपात झाला. त्यानंतरही सेवेत रुजू न केल्याने संबंधित राठोड दाम्पत्यास उपासमारीची वेळ आली. शुक्‍ला यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी खासदार आणि बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी दिनेश राठोड, ऍड. रमेश राठोड उपस्थित होते.

हरिभाऊ राठोड म्हणाले, शुक्‍ला यांनी राठोड दाम्पत्यावर बेकायदेशीर कारवाई केली. अंजली कुलकर्णी व शरद कुलकर्णी यांना एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले भारतीय दाम्पत्य म्हणून गौरव प्राप्त करायचा होता. तो मान राठोड दाम्पत्यास मिळू नये याकरिता त्यांनी त्यांचे ओळखीचे शुक्‍ला यांच्याकडे तक्रार करून कारवाईस भाग पाडले.

पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग असोसिएशनमार्फत राठोड दाम्पत्याने ऑस्ट्रेलियातील दहा शिखरे सर केली होती. ती शिखरे सर झाल्यानंतर त्यांचे मूळ प्रमाणपत्र देण्यासाठी गिर्यारोहक सुरेंद्र शेळके याने राठोड दाम्पत्याकडे पाच लाख रुपये मागणी केली. परंतु, राठोड यांनी ती न दिल्याने शेळके व कुलकर्णी यांनी याबाबत नेपाळ सरकारकडे ई-मेलद्वारे त्यांच्या विरोधात तक्रार दिली. सोलापूर येथील गिर्यारोहक आनंद बनसोडे याने ही राठोड दाम्पत्य मूळचे सोलापूरचे असल्याने त्याचे महत्त्व कमी होईल या हेतूने शेळकेचे मदतीने खोटे आरोप राठोड दाम्पत्यावर केले.

नेपाळचे पर्याटनमंत्री नारायण देव यांना भेटून आपण राठोड दाम्पत्याचे एव्हेरस्ट मोहीमेविषयी माहिती घेतली असता, संबंधित मोहीम झाल्यानंतरच त्यांना सर्टिफिकेट दिल्याचे समोर आले आहे, असेही राठोड म्हणाले.

 

News English Summary: The political atmosphere in the state is heating up over the phone tampering case. In it, the authorities have become aggressive after the Chief Secretary submitted a report to the state government. It is noteworthy that Rashmi Shukla had wrongly obtained approval from the Home Department and used the same against the government. He has also been charged. After the ransom case in Pune, another charge has been leveled against Rashmi Shukla.

News English Title: IPS Rashmi Shukla took illegal action against Rathod couple allegations of Haribhau Rathod news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x