7 May 2021 10:15 PM
अँप डाउनलोड

अजित पवारांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल खंडणी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात

Gadgil jewelers, Mangaldas Bandal, Ajit Pawar

पुणे, १३ मार्च : पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचे सांगितले जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. मंगलदास बांदल हे माजी जिल्हापरिषद सदस्य, बांधकाम समितीचे माजी सभापती आणि शिक्षण समितीचे माजी सभापती आहे. बांदल हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. बांदल हे वादग्रस्त राहिले असून यापूर्वी २०१७ मध्ये आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेमुळे छापेमारी केली होती.

या प्रकणात आशिष पवार, रमेश पवार, रुपेश चौधरी यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात गाडगीळ यांच्या कुटुंबातील महिलेची एक व्हिडीओ क्लिप चोरून बनवण्यात आली होती आणि ती दाखवून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. आशिष चौधरी याने पिस्तूल दाखवून सराफांना कोणाकडे वाच्यता केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही सराफाने आम्ही इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही असं सांगितल्यावर सराफांना धमकी दिली जात होती. मात्र यानंतर सराफांनी पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षाकडून विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडका सुरु होता. शिरूर मतदारसंघातही शिवसेनेकडून तोच कित्ता गिरवला जात होता. मात्र, यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत मंगलदास बांदल यांची उपस्थिती चर्चेचा विषय झाली होती. मंगलदास बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असून देखील ते शिवसेनेच्या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसले होते. त्यानंतर ते पुन्हा मनसेच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसले होते.

शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत ते अनेकदा दिसून आल्याने बांदल लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, असे सांगितले गेले. त्यानंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकीटावर दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता होती. त्यामुळे राजकीय दृष्ट्या अविश्वासू नेते अशीच त्यांची राजकीय कारकीर्द असल्याने तसेच आर्थिक दृष्ट्या संपन्न असल्याने ते कोणाशीही राजकीय वैर स्वीकारण्यास तयार असतात असाच त्यांचा इतिहास राहिला आहे.

 

News English Summery: An unnamed drunken businessman in Pune has been accused of threatening to kill a pistol and threatening to kill him. NCP’s regional vice president Mangaldas Bandal is said to be summoned to investigate the case. Ashish Pawar (27), Ramesh Pawar (32) and Rupesh Chaudhary (45) were arrested by the anti-ransom squad in the case. Of these, Ashish Pawar was working as a bodyguard for a few days back. Saurabh Gadgil, a renowned Jeweler from Pune, has lodged a complaint. A video clip of a woman from Gadgil’s family was stolen in this case and Gadgil was blackmailed by showing it. Ashish Chowdhury had shown a pistol and threatened to shoot the seraphs if they were shot. Even then, the Jeweler was threatened when he said that we could not pay such a large sum. But then the seraphs rushed to the police. Police later searched the accused’s location. The police set a trap and took them into custody.

 

Web News Title: Story an inquiry into Gadgil jewelers fifty crore demanding case Ajit Pawars proximity Mangaldas Bandal Pune.

हॅशटॅग्स

#NCP(347)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x