26 October 2021 5:41 AM
अँप डाउनलोड

'पेट्रोल-डिझेलचे' भाव भडकले आणि नागरिकांची 'माथी' सुद्धा

मुंबई : देशाच्या आर्थिक वर्षाची सुरवात झाली ती पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आणि सकाळी घराबाहेर पडलेले नागरिक पेट्रोलपंपवर पेट्रोल-डिझेलचे भडकले दर पाहून संतप्त प्रतिक्रिया देताना पहायला मिळत आहेत. काही जण तर नरेंद्र मोदींच्या निवडणुकीतील आश्वासनांचा उजाळा देत, हेच का ते ‘अच्छे दिन’ असा संतप्त प्रश्न विचारात आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली असून देशभरात इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठले आहेत. घराबाहेर पडलेल्या सामान्यांकडून तीव्र प्रतिक्रिया पाहावयास मिळत आहेत. मुंबईतील पेट्रोलचा नवा दर प्रति लिटर ८१ रुपये ५९ पैसे इतका तर डिझेलचा ६८ रुपये इतका झाला आहे. हेच का मोदीसरकारचे अच्छे दिन असे संतप्त सवाल सामान्यांकडून येत होते. सप्टेंबर २०१४ नंतर पेट्रोलच्या दराने गाठलेला हा नवा उच्चांक आहे.

मोदीसरकारने पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानं पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल करतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पेट्रोल – डिझेलचे दर सतत वाढताना दिसत आहेत. केवळ एका वर्षात एकट्या मुंबईत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 9 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

शहरांमधले पेट्रोल-डिझेलचे भाव

मुंबई : पेट्रोल ८१.५९ रू – डीझेल ६८.७७

नागपूर : पेट्रोल ७६.९२ रू – डीझेल ६९.२७

पुणे : पेट्रोल ८१.०५ रू – डीझेल ६७.१७

नाशिक : पेट्रोल ८२.१ रू – डीझेल ६८.२६

औरंगाबाद : पेट्रोल ८२.१७ रू – डीझेल ६९.३१

रत्नागिरी : पेट्रोल ८२.७५ रू – डीझेल ६८.९५

कोल्हापूर : पेट्रोल ८१.९५ रू – डीझेल ६८.१३

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)#Narendra Modi(1656)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x