23 August 2019 12:02 AM
अँप डाउनलोड

विधानसभा निवडणुकीत वंचित व मनसेला सोबत घेणार: बाळासाहेब थोरात

विधानसभा निवडणुकीत वंचित व मनसेला सोबत घेणार: बाळासाहेब थोरात

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर थेट राहुल गांधींपासून अनेकांनी स्वतःच्या पदाचे एकावर एक असे राजीनामा सत्र सुरु केले. त्यानंतर महाराष्ट्रात देखील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था दयनीय झाल्याने आणि पक्षाचा केवळ एकच खासदार निवडून आला जो आयत्यावेळी शिवसेनेतून आयात करण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनतर काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचदरम्यान काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली आहे.

विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीने जरी २८८ जागांसाठी मुलाखतीची तयारी केली असली, तरी पक्ष म्हणून हे सर्व करणे योग्य आहे. मात्र आम्ही समविचारी, धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांना एकत्रित करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत असे विधान केले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कॉंग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी तर नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीतक कदम आणि मुझफ्फर हसन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसने राज्य पातळीवर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठे फेरबदल केल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या