18 November 2019 12:21 AM
अँप डाउनलोड

अमरावती लोकसभा: नवनीत कौर राणा काँग्रेस आघाडीत सामील

Amaravati, Loksabha, Navneet Rana Kaur

अमरावती : मागील लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या. यंदाही रवी राणा यांनी काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावतीची जागा रवी राणा यांच्यासाठी सोडण्यास संमती दिली आहे. परंतु यंदा त्यांची पत्नी नवनीत कौर राणा या राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असून स्वत:च्या युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचा मार्ग मात्र खडतर झाला आहे, असे स्थानिक राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या