20 June 2021 9:18 PM
अँप डाउनलोड

भाजपची सत्ता गेली की त्यांची सुद्धा चौकशी होणार: राज ठाकरे

कोंकण : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून सर्वच पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने थेट राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केला असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कर्नाटक मध्ये नक्की कोणाची सत्ता येणार हे अनिश्चित झाले असले तरी भाजप सत्तेचा दूर उपयोग करून काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना करोडो रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या पक्षातून फोडण्याचा प्रयत्नं करत आहे असा आरोप विरोधी पक्ष थेट पत्रकार परिषद घेऊन सांगत आहेत.

कर्नाटकचे विद्यमान राज्यपाल हे नरेंद्र मोदींचे गुजरातमधील जुने सहकारी असल्याने तिथे पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत असून त्यालाच अनुसरून जेंव्हा कोकण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपच्याच बाजूने जाणार’ असे मत त्यांनी मांडले आहे. पुढे ते म्हणाले की, भाजप केवळ सत्तेचा दुरुपयोग करत आहे. सत्ता आहे म्हणून भाजपाने दुरुपयोग करू नये. भविष्यात भाजपाची सुद्धा वेळ येणार आहे. सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x