5 August 2021 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | पौष्टिक नाचणी डोसा बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा
x

नियम पाळू, पण दहीहंडी साजरी करणारच | मनसेचा निश्चय

Raj Thackeray

ठाणे, २१ जुलै | गेल्या वर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात मागील वर्षी शुकशुकाट पाहायला मिळाला. तर आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोरोना संकटामुळे अनेक सण, उत्सवांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर आली. दसरा, दिवाळीसारखे सणही अत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र दहीहंडी उत्सवासाठी शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन 31 ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजित पानसे यांनी म्हटलंय.

कोरोनाचे सर्व नियम पाळून दहीहंडी साजरी करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निश्चय असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी अनेक मंडळांना आवाहन देखील करण्यात आलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहिहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असं आवाहन अभिजित पानसे यांनी केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या निर्धारामुळे आता राज्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Party will celebrate Dahi Handi Utsav this time said Abhijeet Panse news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(182)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x