23 October 2019 11:04 AM
अँप डाउनलोड

खासदार उदयनराजेंचं ठरलं, पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

Satara MP Udayanraje Bhosale, MLA Ramraje Naik Nimbalkar, NCP, BJP, Shivsena

सातारा: राष्ट्रवादीचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आपला भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे, दिल्लीत पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ते शनिवार १४ सप्टेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाहीतर भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी उदयनराजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेतात, याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लागले आहे. उदयनराजेंनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज अचानक शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यामुळे राजेंच्या मनात नेमकं काय चाललंय, याची उत्कंठा वाढली असतानाच राजेंचा अंतिम निर्णय झाल्याचे वृत्त पुढे येऊ लागले आहे.

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच नेते मंडळी चांगलेच सक्रीय होताना दिसत आहे. निवडणूक काही दिवसांवर आली असताना देखील नेते मंडळीचे पक्षांतराचे सत्र धडाक्यात सुरु आहे. तसेच मोर्चेबांधणी, राजकीय दौरे, गाठीभेटी यांसारख्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले पवारांची साथ सोडून भाजप मध्ये जाणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला होता. मात्र आता उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(21)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या