25 April 2024 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

बाळासाहेबांनी मला नेहमीच गोरगरीबांच्या मुलांची काळजी घ्यायला शिकवलं: उद्धव ठाकरे

Shivsena, Udhav Thackeray

औरंगाबाद : युतीपूर्वी आमच्यात मतभेद होते, त्यावेळी आम्ही भारतीय जनता पक्षावर जाहीर टीका केली. परंतु हे मतभेद शिवसेनेने कधीही राज्याच्या विकासाच्या आड येऊ दिले नाहीत. आम्ही एकमेकांमध्ये कधीही तंगड घातलं नाही, असा एकतरी मुद्दा दाखवा, असे स्पष्टीकरण देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरही टीका केली. आघाडी करताना हातात हात घालून त्यांनी तंगड्यात तंगडं घातलं आहे, त्यामुळे ते नक्कीच पडणार असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद येथे शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा युतीच्या संयुक्त मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे. तसेच राज्यातून भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकडया नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये.

शरद पवारांवर टीका करताना ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच मला गोरगरीबांच्या मुलांची पहिल्यांदा काळजी घ्यायला हवी, त्यांचे लाड करायला हवेत असेच शिकवले आहे. तसेच राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले होते की, ईडीच्या भीतीने यांनी युती केली. मात्र, ईडीची भीती आम्हाला नाही तर तुम्हाला आहे. या ईडापिडा तुमच्याकडे आहेत आमच्याकडे नाहीत.

जनतेला मी जे वचन दिलं होतं ते मी पाळलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ५०० फूटांपर्यंतच्या घरांचं मालमत्ता कर आणि नाणार प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावेळीही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आम्ही पुढे गेलो, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

असं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी मागील ५ वर्षात कोणत्या गोरगरिबांच्या मुलांची काळजी घेतली याची काहीच अधिकृत माहित भाषणातून दिलीनाही . केवळ निवडणुका आल्याने काहीदेखील बोलताना दिसत आहेत.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x