27 July 2024 6:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत शिवसेनेला स्वबळावर भोपळा तर जळगाव'मध्ये एनसीपी-काँग्रेसचा सुपडा साफ

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या २० प्रभागातील ७८ जागांसाठी प्राथमिक अंदाजानुसार ६० टक्के मतदान झाले होते. स्वबळाचा नारा देऊन भाजपसह स्थानिक आघाडीचा हात झिडकारणारी शिवसेना तोंडघशी पडली आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे बडे नेतेही प्रचाराला आले होते, परंतु स्थानिक जनतेने शिवसेनेला अक्षरशः झिडकारलं आहे.

वास्तविक भाजपने सुद्धा शिवसेनेकडे युतीसाठी पुढाकार घेतला होता, परंतु तो प्रस्ताव झिडकारण्यात आला आणि इतकंच नाही तर माजी आमदार संभाजी पवार गटाची शहरात ताकद होती आणि शिवसेनेसोबत होते, परंतु जातीय गणितात आघाडीचा प्रस्ताव होता. स्वाभिमानी विकास आघाडी या संभाजी पवार गटाच्या संघटनेला काही जागांवर लढू द्या, असा प्रस्ताव शिवसेनेकडे देण्यात आला होता. परंतु शिवसेनेने तो सुद्धा अमान्य आणि शिवसेनेच्या गोटातून पवारांची ताकद वजा झाल्याने अपेक्षित परिणाम समोर आले.

आता सारवासारव करताना आम्ही तर पुढच्या निवडणुकीसाठी पेरणी करत होतो असं उत्तर स्थानिक नेते मंडळी देत आहेत. शिवसेनेतील या नकारात्मक पराभवाच्या मालिका शिवसेनेसाठी भविष्यातील डोकेदुखी ठरू शकतात आणि भाजप शिवाय स्वबळावर जिंकणं कठीण असल्याचं पक्षातील नेतेमंडळी कुजबुजत आहेत.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x