19 October 2021 9:11 AM
अँप डाउनलोड

पुण्यातील भाजपचे ४ आमदार डेंजर-झोन मध्ये - संजय काकडे

पुणे : पुणे भाजपमध्ये आता पासूनच कलगीतुरा रंगायला लागला आहे. त्यात शुक्रवारी भाजपचे पुण्यातील खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळ जनक वक्त्यव्य केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

२०१९ मधील पुण्याची लोकसभा मीच लढवणार असल्याचे स्वतःच जाहीर करून टाकले आहे. खासदार संजय काकडे यांनी स्वतःच एक सर्वेक्षण केलं असून त्यात त्यांनी पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यापेक्षा मीच अधिक उजवा आहे असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी स्वतःच करून घेतलेल्या सर्वेक्षणात भाजपसाठी एक डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आणली आहे.

काकडेंनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या पुण्यातील ८ आमदारांपैकी तब्बल ४ आमदार ‘डेंजर-झोन’ मध्ये असून त्यांचा दारुण पराभव होऊ शकतो,” असा धक्कादायक दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(676)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x